HW News Marathi
Covid-19

शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांना कोरोनाची लागण

सिंधुदुर्ग | राज्यात कोरोना रुग्ण वाढत आहेत तशी चिंता आणखी वाढत आहे. राजकीय क्षेत्रात नेत्यांना, आमदारांना कोरोना होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. सिंधुदुर्गात शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कात असलेल्या सगळ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

वैभव नाईक हे कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार आहेत. लॉकडाऊनच्या काळात नाईक यांनी जिल्ह्यात अनेक ठिकाणी दौरा केला होता. यावेळी त्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

वैभव नाईक हे दोन-तीन दिवसांपूर्वी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या सोबत दौऱ्यासोबत होते. आमदार नाईक यांच्या सहवासात जिल्ह्यातील अनेक लोकं आणि शिवसेनेचे जिल्ह्यातील बहुसंख्य अनेक पदाधिकारी संपर्कात आलेले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Coronavirus : राज्याचा आकडा २३४०१, आज ५८७ कोरोनामुक झाले

News Desk

“रुग्णसंख्या वाढली की जनता बेजबाबदार कमी झाली की…”; राज्य सरकारला मनसेचा सवाल

News Desk

पुण्यात आज नवे २७५ कोरोनाबाधित रुग्ण

News Desk