HW News Marathi
महाराष्ट्र

धनंजय मुंडेंबाबत केलेल्या वक्तव्यावरुन शरद पवारांचा युटर्न

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे प्रकरणातील आरोपांना एक वेगळच वळण लागले आहे. भाजप आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हालाही या महिलेने गळ घातल्याची तक्रार पोलिसांत केली आहे. यामुळे प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी बोलताना आरोपांचं स्वरुप गंभीर असल्याचं म्हटलं होतं. मात्र आता नवीन घडामोडी समोर आल्यानंतर शरद पवारांनी त्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. ते मुंबईत आज (१५ जानेवारी) पत्रकारांशी बोलत होते.

“आरोप करणाऱ्या व्यक्तींच्या सदर्भात अजून तक्रार समोर आल्यानंतर याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशा निष्कर्षावर आम्ही आलो आहोत. पोलीस योग्य काम करतील असा विश्वास आहे. पोलिसांच्या चौकशीत हस्तक्षेप करण्याचं कारण नाही, पण आम्ही तपासात एसीपी दर्जाची माहिला अधिकारी असावी असं सुचवलं आहे. पोलिसांनी सर्वांशी चर्चा करुन वस्तुस्थिती समोर आणण्याचा प्रयत्न करावा,” असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

दरम्यान काल (१४ जानेवारी) केलेल्या वक्तव्यासंबंधी बोलताना ते म्हणाले की, “काल बोललो तेव्हा हे सर्व मला माहिती नव्हतं. एखाद्या भगिनीने तक्रार करणं याची नोंद गांभीर्याने घेतली पाहिजे या भावनेने मी गंभीर शब्द वारपरुन भूमिका घेतली. आता अधिक खोलात जाऊन वास्तव पुढे आणण्याची गरज आहे. कोणत्याही निर्णयावर येणं हा एखाद्यावर अन्याय करण्याची शक्यता नाकारता येत नाही. आम्ही तपासातून येणाऱ्या निष्कर्षाची वाट पाहत आहोत”.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

परळी तालुक्यातील जलयुक्त शिवार योजनेच्या घोटाळ्यात आणखी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात!

Aprna

अभिनेता गोविंदाच्या उपस्थितीत परळीत मोठ्या थाटात साजरा झाला शरद पवारांचा वाढदिवस !

News Desk

माजी खासदार किरीट सोमय्या आज बीडमध्ये; पत्रकार परिषदेकडे लक्ष

News Desk