HW News Marathi
महाराष्ट्र

“हे सगळं शरद पवारांचं नाटक”, किरिट सोमय्या संतापले

मुंबई | राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा न घेता तूर्तास वेट अँड वॉचची भूमिका घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसवर भाजप नेते किरीट सोमय्या चांगलेच तापले आहेत. हे सगळं शरद पवार यांचं नाटक आहे. रेणू शर्मा यांच्यावर कोणतेही आरोप होऊ देत. पण त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेल्या बलात्काराच्या आरोपांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही, असे किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे.

गेल्या काही तासांमध्ये समोर आलेल्या घटनांमुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसने धनंजय मुंडे यांच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून तूर्तास धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात येणार नाही, अशी माहिती समोर आली होती. या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे.

धनजंय मुंडे यांचे तीन-तीन बायकांबरोबर संबंध होते. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणारी महिला कशी आहे, याचा पोलिसांनी जरुर तपास करावा. मात्र, धनंजय मुंडे यांनी आतापर्यंत ही माहिती का लपवून ठेवली. धनंजय मुंडे यांनी काहीतरी केलंच असेल म्हणूनच संबंधित महिला त्यांना ब्लॅकमेल करत असेल. अशी व्यक्ती मंत्रिपदावर राहूच शकत नाही. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मराठा क्रांती मोर्चा’चा राजकारणासाठी वापर करणाऱ्यांना धडा शिकवू !

News Desk

संकटाचा सामना करण्याचा सरकारला अनुभव – शरद पवार

News Desk

विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मराठी भाषा विधेयक मंजूर

Aprna