HW News Marathi
महाराष्ट्र

ईडीचे अधिकारी भाजपची ATM मशीन! – संजय राऊत

मुंबई | ईडीचे अधिकारी भाजपची एटीएम मशीन झाले आहेत, असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ई़डीवर केला आहे. राऊतांनी आज (८ मार्च) पत्रकार परिषदेतून केंद्रीय तपास यंत्रणा ईडी आणि आयकर विभाग पुन्हा एकदा ताशेरे ओढले आहे. राऊत म्हणाले, “ईडी १०० पेक्षा अधिक व्यावसायिकांना धमकावले जात आहे. आणि त्या व्यावसायिकांकडून खंडणी वसुली करण्याचे काम करत आहे. जितेंद्र नवलानी ही व्यक्ती ईडीचे रॅकेट चालवत असून त्यांची कन्सल्टन्सी कंपनी चालवत आहेत. नवलानी हे ईडीचे कर्मचारी देखील नाहीत. आता ईडी हे भाजपसाठी एटीएम मशीन प्रमाणे काम करत आहेत.”

राऊत म्हणाले, “नवलानींच्या खात्यावर अविनाश भोसले यांच्या कंपनीकडून १० कोटी रुपये घेतले आहे. जेव्हा भोसलेंच्या कंपन्यांची चौकशी सुरू होती. तेव्हा अजून १६ कोटी रुपये ट्रान्सफर झाले. ईडी आणि आयकर विभागाला आम्ही ५० नवा दिली आहे. परंतु, केंद्रीय तपास यंत्रणा याबद्दल कारवाई करत नाही. संपूर्ण देशात फक्त महाराष्ट्रात सर्वाधिक धाडी का?, असा सवाल त्यांनी केला आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा झाल्यांची पवारांची माहिती

News Desk

हिंगणघाट जळीत कांड : पीडित तरुणीची प्रकृती गंभीर, उद्या आणखी एक शस्त्रक्रिया

News Desk

नगराध्यक्ष थेट जनतेमधून निवडून देता येणार, मंत्रिमंडळात घेतला निर्णय

Aprna