HW News Marathi
महाराष्ट्र

RBIने वसंतदादा सहकारी बॅंकेचं लायसन्स केलं रद्द

मुंबई | उस्मानाबादमधील वसंतदादा नागरी सहकारी बॅंकेचं लायसन्स रद्द करण्यात आले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे बँकेला आजपासून कोणतेही व्यवहार करता येणार नाहीत. त्यामुळे वसंतदादा नागरी सहकारी बँकेच्या ग्राहकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. रिझर्व्ह बँकेने एक प्रेसनोट रिलीज करून वसंतदादा नागरी सहकारी बँकेचं लायसन्स रद्द करण्यात आल्याची माहिती दिली आहे.

कालपासून म्हणजेच ११ जानेवारीपासून या बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे. ही माहिती देताना बँकेचा परवाना रद्द करण्याची अनेक कारणंही दिली आहेत. बँकेची सध्याची वित्तीय स्थिती पाहता ही बँक ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यात असमर्थ आहे, असं एक प्रमुख कारण आरबीआयने दिलं आहे. २०१७मध्ये या बँकेवर रिझर्व्ह बँकेने आर्थिक निर्बंध घालूनही बँकेने वित्तीय स्थिती सुधारली नाही. त्यामुळे बँकेवर कारवाई करण्यात आली आहे. या बँकेत हजारो ठेवीदारांच्या लाखो ठेवी आहेत.

आरबीआयने काही दिवसांपूर्वीच कोल्हापूरच्या सुभद्रा लोकल एरिया बँकेचा परवान रद्द केला होता. त्याआधी जालन्यातील मंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध घातल्यानंतर सातारा जिल्ह्यातील नावाजलेली ‘कराड जनता बँक’ दिवाळखोरीत गेल्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या बँकेचा परवाना रद्द केला होता. कराड जनता बँक ही सातारा जिल्ह्यात एक नावाजलेली बँक आहे. सहकाराच्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या या बँकेचे हजारो ठेवीदार आहेत. या बँकेवर २०१७ मध्ये रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातले होते. त्यानंतर आता ही बँक दिवाळखोरित गेल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. ही अधिकृत घोषणा सहकार आयुक्तांनी केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंचगंगेच्या नदीपात्रात फुटबॉल स्पर्धेचे आयोजन 

News Desk

राष्ट्रवादीच्या विक्रमी सभांमुळे महाराष्ट्रात तुफान

News Desk

भीमा कोरेगाव इतिहास शाळांमध्ये शिकवण्यासाठी शिक्षणमंत्र्यांना रामदास आठवले पत्र लिहिणार

News Desk