HW News Marathi
Covid-19

भारतात १६ जानेवारीपासून जगातील सर्वात मोठ्या लसीकरण कार्यक्रमाला होणार सुरुवात | पंतप्रधान

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (११ जानेवारी) कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम कसा असणार आणि कोरोनाची एकूण इतर राज्यांमधील काय स्थिती आहे याचा आढावा घेण्यासाठी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बातचीत केली. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा कार्यक्रम कसा असेल याची सविस्तर माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांशी बोलताना मोदी म्हणाले, “कोविडच्या बिकट परिस्थितीत आपण एकमेकांसोबत काम करत आहोत, याबाबत मी समाधानी आहे. सर्व राज्यांनी संवेदनशील पद्धतीने तातडीने निर्णय घेतले. त्याचाच परिणाम म्हणून जगात जितक्या मोठ्या प्रमाणावर करोनाचा फैलाव झाला तितक्या प्रमाणात तो भारतात झाला नाही.”

१६ जानेवारीपासून सुरु होणार जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम

मोदी म्हणाले, १६ जानेवारीपासून भारतात जगातील सर्वात मोठा लसीकरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. दोन ‘मेड इन इंडिया’ लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे.

सर्वात आधी कोणाला मिळणार लस?

सरकारी आणि खासगी आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, कोविडशी आघाडीवर लढणारे इतर कर्मचारी, संरक्षण दलं, पोलीस आणि इतर निमलष्करी दलं यांचं पहिल्या टप्प्प्यामध्ये लसीकरण केलं जाणार आहे. या पहिल्या टप्प्यामध्ये सुमारे ३ कोटी कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ५० वर्षांवरील आणि ५० वर्षांखालील रुग्णांना लस दिली जाईल. दरम्यान, येत्या काही महिन्यांमध्ये ३० कोटी लोकांना लस देण्याचं आमचं ध्येय आहे.

कोविड योद्ध्यांना मोफत मिळणार लस

जर सर्व राज्यातील आरोग्य कर्मचारी आणि कोविड योद्ध्यांची संख्या पाहिली तर ती सुमारे ३ कोटी इतकी आहे. हे निश्चित झालं आहे की, या पहिल्या टप्प्यातील ३ कोटी लोकांच्या लसीकरणासाठी राज्यांना कोणताही खर्च करावा लागणार नाही. भारत सरकार हा खर्च करणार आहे, असेही मोदी यावेळी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आज पुणे दौरा, कोरोनास्थितीचा घेणार आढावा

News Desk

महाराष्ट्राला कोरोना लसींचा पुरवठा करण्यास केंद्राकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ !

News Desk

राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीतील ‘हे’ महत्वाचे मुद्दे

News Desk