HW News Marathi
महाराष्ट्र

महाजाॅब्स ही योजना महाविकास आघाडी सरकारची आहे, की शिवसेना-राष्ट्रवादीची? – सत्यजित तांबे यांचा आघाडीला सवाल

मुंबई | राजकारणात सध्या अस्थिरता दिसत आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये समन्वय नसल्याचे अनेक वेळा दिसून आले होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सामानाच्या मुलाखतीत या सर्व बाबींना फेटाळले होते. आणि आघाडीत सर्व नीट सुरू आहे असे म्हटले होते. मात्र, आता पुन्हा एकदा आघाडीत आलबेल नसल्याचे चित्र समोर आले आहे.

युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी थेट महाविकास आघाडीला काही दिवसांपूर्वीच सुरू करण्यात आलेल्या महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीवरून प्रश्न विचारला आहे.

या जाहिरातीत केवळ राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांचे फोटो दिसत आहेत त्यावरून ही योजना केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादीची आज का? असा प्रश्न सत्यजित तांबे यांनी ट्विट करत उपस्थित केला आहे.

 

‘महाजाॅब्स ही योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे, की शिवसेना-राष्ट्रवादीची? आघाडीचे गठन होत असताना, ठरलेल्या किमान समान कार्यक्रमाची व त्यातील शिष्टाचारांची अंमलबजावणी का होत नाही ? हा माझ्या सारख्या सामान्य काॅंग्रेस कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे’, असे ट्विट त्यांनी केले आहे.

महाजाॅब्स पोर्टलच्या या जाहिरातीवर केवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, कौशल विकास मंत्री नवाब मलिक, उद्योग राज्यमंत्री अदिती तटकरे यांचे फोटो आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा आघाडीत काहीतरी बिघाड असल्याचे समोर आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंना तिरंगा घेऊन चालताना बघून केवळ मीच नाही….”, पंतप्रधान मोदी!

News Desk

‘निवडणुकीला उभं करून पाडायचं षडयंत्र संजय काकांनींच रचलं’, भाजपाच्या माजी आमदाराचा खासदारावर गंभीर आरोप!

News Desk

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, मराठवाड्याच्या पाण्यासाठी नदीजोड प्रकल्पास मान्यता

News Desk