HW News Marathi
महाराष्ट्र

शिक्षकांच्या बदल्या ‘ऑफ लाइन’ होणार?हा निर्णय भ्रष्टाचाराला वाव देणारा निर्णय असेल – पंकजा मुंडे

बीड | भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांच्या कार्यकाळात भ्रष्टचाराला आळा घालण्यासाठी व शिक्षण क्षेत्रात पारदर्शकता टिकवण्यासाठी शिक्षक बदली ही “ऑन लाइन” पद्धतीने केली होती . मात्र महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झाल्यामुळे पूर्वीच्या काळात घेतलेले काही निर्णय हे बदलत असून या पैकी शिक्षकांच्या बदल्या ह्या परत ऑफ लाईन पद्धतीने होणार असल्याची माहिती पंकजा मुंडे यांच्या कानावर आल्याने ही शंका ट्विट करत व्यक्त केली आहे.

कोरोनाच्या धर्तीवर शिक्षकांच्या बदल्या ऑफ लाईन पद्धतीने होणार असे ऐकले,ज्याचा वशिला नाही,वाली नाही आणि त्या गरीब शिक्षकांसाठी हा ऑफ लाईनचा निर्णय कोरोनाच्या संकटात आणखी संकट आणेल, राज्यसरकारने यावर पुनर्विचार करण्याची गरज आहे. पारदर्शकता आणि मेरिट सोडून भ्रष्टाचार व शोषण होईल, असे ट्विट पंकजा मुंडे यांनी केले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याबाजुने सर्व सदस्य एकवटले…

News Desk

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सेवा पूर्व प्रशिक्षणासाठी २५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत

Aprna

शाळकरी मुलांच्या पाण्यात बुडून मृत्यूच्या कारणावरून परत मुंडे बहीण-भावात जुंपली

Aprna