HW News Marathi
राजकारण

मराठा आरक्षणावर पुढची सुनावणी २७ जुलैला,सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष!

दिल्ली| मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात प्रचंड मोर्चे निघाले होते,सर्वत्र या आरक्षणाची चर्चा झाली.महाराष्ट्रातील सर्व पक्षांचं यावर एकमत असूनही हे प्रकरण मात्र कोर्टात अडकलं आहे. आज (१५ जुलै) ला सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाबाबत चौथी सुनावणी पार पडली आहे. मराठा आरक्षण आणि पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमातील प्रवेशाच्या संदर्भात न्यायमूर्ती एन नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखालील तीनसदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी झाली. आरक्षण प्रकरणावर पुढची सुनावणी ही 27 जुलै रोजी होणार आहे.

राज्य सरकारच्या वतीने मराठा आरक्षण वैध ठरवण्यासाठी तयारी करण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायलयात ही याचिका लढवण्यासाठीमहाराष्ट्र सरकारकडून तज्ज्ञ वकिलांची टीम तयार करण्यात येत आहे. देशाचे दिग्गज वकील कपिल सिब्बल यांची मराठा आरक्षणासंबंधी खटला लढवण्यासाठी राज्य सरकारकडून नियुक्ती करण्यात आली आहे.

आज सुप्रिम कोर्टात झालेल्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला आणि याचिकाकर्त्यांना धारेवर धरले. आतापर्यंत मराठाआरक्षणावर अंतिम निर्णय देत असताना 3 ते 4 वेळा दिलासा देण्यात आला. त्यामुळे यात अजून किती बदल करायचा आहे. त्यामुळेपुढील आठवड्यात यावर पुन्हा एकदा सुनावणी घेतली जाईल, असं न्यायमूर्तींनी स्पष्ट केले. पुढील सुनावणीही व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारेघेण्यात येईल असंही न्यायमूर्तींनी स्पष्ट केलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पक्षांच्या रात्रीच्या प्रचारामुळे लोकांना त्रास, निवडणूक आयोगाने घातली बंदी

News Desk

मी लोकसभा निवडणूक लढविणार नाही !

News Desk

प्रियांका गांधींच्या राजकारणातील प्रवेशाने भाजप घाबरले !

News Desk