HW News Marathi
देश / विदेश

भाजपने सरकार पाडण्यासाठी रचलेल्या कारस्थानात पायलट अडकले – रणदीप सुरजेवाला

नवी दिल्ली | राजस्थानमध्ये काँग्रेसमधील नाराजी आणि राजकीय संकट सुरुच असताना सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री पदावरून हटवण्यात आले. तसेच, त्यांच्याकडून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद देखील काढून घेण्यात आले आहे. तसेच त्यांना पाठिंबा देणाऱ्या इतर मंत्र्यांचीही हकालपट्टी करण्यात आली. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेत या निर्णयाची घोषणा केली. तसेच काँग्रसेच्या पक्षांतर्गत नव्या नियुक्त्यांचीही माहिती दिली.

सुरजेवाला म्हणाले, “सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री आणि विश्वेंदर सिंह आणि रमेश मिना यांना मंत्रिपदावरुन तात्काळ काढलं जात आहे. राजस्थान काँग्रेसच्या प्रदेशाध्यपदावर राजस्थानचे शिक्षण मंत्री गोविंदसिंह यांची नियुक्ती करण्यात येते. ते शेतकरी पुत्र असून त्यांनी शेतीच्या मशागतीसोबतच काँग्रेसची देखील मशागत केली. ते जिल्हाध्यक्ष पदावरुन इथपर्यंत आले आहेत.”

“आदिवासी सहकारी आमदार गणेश गोगरा यांना राजस्थानच्या यवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात येत आहे. हेमसिंह शेखावत यांना राजस्थान प्रदेश सेवा दलाच्या अध्यक्षपदी निवडण्यात आलंआहे,” असंही सुरजेवाला यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी काँग्रेसचं सरकार व्यक्तीवर अवलंबून नाही, तर मुल्यांवर टिकलेलं असल्याचं सांगत हे सरकार 5 वर्षे टिकेल असंही सांगितलं.

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी सचिन पायलट यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. सुरजेवाला यांनी पायलट यांना त्यांचं म्हणणं पक्षाच्या मंचावर मांडण्यास सांगितलं. त्यांनी अगदी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचाही हवाला देत सर्वजण त्यांचे म्हणणे समजून घेण्यास तयार असल्याचे सांगितले होते. मात्र, यानंतरही सचिन पायलट तयार नसल्याचे चित्र होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यंमंत्र्यांची कुटुंबासमवेत अयोध्या वारी !

swarit

भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या पाच सैनिकांना कंठस्नान

News Desk

काश्मीर फुटीरतावादी नेता यासिन मलिकला जन्मठेप, NIA च्या विशेष न्यायालयाने सुनावली शिक्षा

Aprna