HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपचे महानगरपालिकेसाठी जबाबदारीचे वाटप, आशिष शेलारांची नवी मुंबईच्या प्रभारी पदी निवड

मुंबई | मुंबई महानगरपालिका निवडणुकी जवळ आली असताना महाविकासआघाडी सरकारमधील पक्ष आणि भाजप जोरदार तयारीला लागले आहेत. भाजपने या निवडणुकीसाठी जबाबदारीचं वाटप केलं आहे. नुकत्याच झालेल्या संघटनात्मक बैठकांमध्ये भाजपने महापालिका निवडणुकांसाठी रणनीती ठरवली. त्यानुसार आशिष शेलार यांची नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून नियुक्त केलं आहे. गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे या दोघांमध्ये समन्वय ठेवून पालिका निवडणुका जिंकण्याचं आव्हान आशिष शेलार यांच्यासमोर आहे.

येत्या काही दिवसात राज्यातील ५ महापालिकांसाठी निवडणुका जाहीर होणार आहेत. यामध्ये नवी मुंबई, औरंगाबाद, कल्याण डोंबिवली, वसई विरार आणि कोल्हापूर महापालिकेची निवडणूक होत आहे. त्यासाठी भाजपने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. या निवडणुकांसाठी भाजपने हुकमी मोहरे निवडले आहेत.

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी आमदार संजय केळकर यांच्याकडे निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी दिली आहे. तर औरंगाबाद मनपासाठी गिरीश महाजन हे निवडणूक प्रभारी म्हणून काम पाहणार आहेत. कोल्हापूर मनपा निवडणुकीसाठी शेखर इनामदार आणि खासदार रणजितसिंह निंबाळकर हे प्रभारी म्हणून काम पाहतील. इतर महापालिका निवडणुकांसाठी मुख्य जबाबदारी आणि प्रभारी यांचे वाटप भाजपने निश्चित करत निवडणुकांच्या तयारीला सुरुवात केली आहे.

भाजपमध्ये जवाबदारी वाटप

नवी मुंबई

निवडणूक प्रमुख -गणेश नाईक

निवडणूक सहप्रमूख – मंदा म्हात्रे

निवडणूक संघटनात्मक जवाबदारी – प्रमुख संजय उपाध्याय

निवडणूक प्रभारी – आशिष शेलार

कल्याण डोंबिवली महापालिका

निवडणूक प्रमुख – रवी चव्हाण.

निवडणूक प्रभारी – संजय केळकर.

औरंगाबाद महापालिका निवडणूक

निवडणूक प्रमुख – अतुल सावे.

निवडणूक प्रभारी – गिरीश महाजन.

निवडणूक संघटनात्मक जवाबदारी – संभाजी पाटील निलंगेकर.

कोल्हापूर महापालिका निवडणुक

निवडणूक प्रमुख – धनंजय महाडिक आणि महेश जाधव.

प्रभारी – शेखर इनामदार, रणजित सिंह निंबाळकर

वसई विरार महापालिका निवडणूक

प्रभारी – प्रसाद लाड

सहप्रभारी -जयप्रकाश ठाकूर, भरत राजपूत

कोणत्या महापालिकेत किती जागांसाठी मतदान?

नवी मुंबई – 111

औरंगाबाद – 113

वसई-विरार – 115

कल्याण डोंबिवली 122

कोल्हापूर 81

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उपमुख्यमंत्री अजित पवारांची ‘त्या’ प्रकरणी CBI चौकशी करा, भाजपच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर

News Desk

पुणे विमानतळाला वाढीव क्षमतेसह नवीन टर्मिनल इमारत मिळणार

News Desk

केंद्र सरकार महाराष्ट्राला दाबाण्याचा प्रयत्न करत आहे, रेल्वे सुरु करण्यावरुन आघाडी सरकारकडून प्रतिक्रिया!

News Desk