HW News Marathi
महाराष्ट्र

“मर्द असाल तर औरंदाबादचे संभाजीनगर असे नामांतर करून दाखवा”, राणेंचं मुख्यमंत्र्यांना चॅलेंज 

कणकवली | औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा सध्या राजकीय वर्तुळात चांगलाच गाजताना आहे. एकीकडे नामांतरासाठी आग्रही असलेल्या शिवसेनेला महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी कडून विरोध होत आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्ष असलेल्या भाजपा आणि मनसेकडून नामांतराच्या मुद्द्यावरून शिवसेनेला सातत्याने डिवचण्याचे काम सुरू आहे. आता या मुद्द्यावरून भाजपा आमदार नितेश राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले आहे. मर्द असाल तर औरंदाबादचे संभाजीनगर असे नामांतर करून दाखवा, असे आव्हान नितेश राणे यांनी दिले आहे.

औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून शिवसेनेला लक्ष्य करताना नितेश राणे म्हणाले की, मर्द असाल तर औरंगाबादचं नाव बदलून दाखवा. बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करून दाखवा. नाहीतर तुम्हाला काय सर्टिफिकेट द्यायचं ते आम्ही देऊ. असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे. तसेच शिवसेनेच्या महाविकास आघाडीतील स्थानाबाबतही नितेश राणे यांनी मोठं विधान केलं आहे. महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस काडीचीही किंमत देत नाही, असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कधी कधी काही माणसं जास्तच बोलतात-महेश तपासे

News Desk

भाजपने निवडणुकीपूर्वीच आत्मविश्वास गमावला, उमेदवारीच्या गोंधळावरून मुंडेंचा विरोधकांना टोला

News Desk

राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख पत्रकार परिषदेत का रडले? काय आहे नेमके प्रकरण? 

News Desk