कोलकाता | टीम इंडियाचा माजी कर्णधार व BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांना मागील आठवड्यात हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. त्यांच्यावर कोलकातातील वूडलँड्स हॉस्पिटलमध्ये अँजिओप्लास्टी करण्यात आली. आता त्याची प्रकृती सुधारली असून आज सकाळी त्याला डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच, गांगुलीने आता मी एकदम ठणठणीत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. गांगुलीच्या या प्रतिक्रियेमुळे जगभरातील कोट्यवधी चाहत्यांना आनंद झाला आहे.
गांगुलीने रुग्णालयातून डिस्चार्ज घेताना, सर्व डॉक्टरांचे आभार मानले. माझ्यावर उपचार केलेल्या सर्वच डॉक्टरांचे मी आभार मानते, मी आता पूर्णपणे बरा झालोय, असे गांगुलीने म्हटले. सौरवला काल (६ जानेवारी) रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार होता, पण त्यानेच आणखी एक दिवस रुग्णालयात राहण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे, त्याला आज (७ जानेवारी) डिस्चार्ज देण्यात आला.सौरवला डिस्चार्ज दिल्यानंतर रुग्णालयाबाहेर त्याच्या चाहत्यांनी गर्दी केली होती. यावेळी, दादाने चाहत्यांना उद्देशून छोटेखानी भाषण केले. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि प्रार्थनांमुळे मला ताकद मिळाल्याचेही गांगुलीने म्हटले.
#WATCH | "I thank the doctors at the hospital for the treatment. I am absolutely fine," says BCCI President Sourav Ganguly after being discharged from Kolkata's Woodlands Hospital. pic.twitter.com/BUwsz5h1FQ
— ANI (@ANI) January 7, 2021
काय झालं होतं?
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांना हृदयविकाराचा झटका आल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिममध्ये व्यायाम करून झाल्यावर त्याला हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर गांगुलीला दक्षिण कोलकाता येथील वूडलँड या एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याच्यावर (२ जानेवारी) सांयकाळी अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया होणार होती. सूत्रांनुसार गांगुलीला जीममध्ये वर्कआऊट करताना त्रास जाणवू लागला होता. यानंतर गांगुलीने वुडलॅंड्स रुग्णालयात तपासणी करुन घेतली. तपासणीत छातीत गंभीर त्रास असल्याचं निदान झालं. यानंतर रुग्णालयाकडून गांगुलीवर अँजियोप्लास्टी सर्जरी करण्यात येणार आहे. डॉक्टर सरोज मंडल तसेच इतर 3 डॉक्टर हे गांगुलीवर अँजियोप्लास्टी करणार होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.