HW News Marathi
महाराष्ट्र

वर्षा राऊत यांना ११ जानेवारीला हजर राहण्यासाठी पुन्हा ईडीकडून समन्स

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची ईडीकडून पुन्हा चौकशी होणार आहे. त्यासाठी ईडीने वर्षा राऊत यांना पुन्हा नवे समन्स पाठवले आहे. त्यानुसार वर्षा राऊत यांना ११ जानेवारील पुन्हा एकदा चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. याआधी ५ जानेवारीला त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. पण त्या एक दिवस आधीच म्हणजे ४ जानेवारीला ईडी कार्यालयात गेल्या होत्या. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. ईडीच्या अधिकाऱ्यांनी जवळपास चार तास वर्षा राऊत यांना प्रश्न विचारले होते. प्रवीण राऊत हे पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) घोटाळ्यातील आरोपी आहेत. प्रवीण राऊत यांच्याशी संजय व वर्षा राऊत यांचे आर्थिक संबंध असून, त्यांचाही या घोटाळ्यात सहभाग असल्याचा ईडीला संशय आहे.

पीएमसी बँकेतील कथित घोटाळ्याच्या चौकशीसाठी वर्षा राऊत यांना 29 डिसेंबर रोजी ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बँकेतील खात्याशी संबंधित कागदपत्रं घेऊन कार्यालयात येण्यास नोटिशीत सांगितलं आहे. संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधवी राऊत आणि वर्षा राऊत यांच्यात झालेले आर्थिक व्यवहार ईडीच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे प्रवीण राऊत यांना काही दिवसांपूर्वी ईडीने अटक केली होती. मात्र त्यांची जामिनावर सुटका झाली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रश्मी ठाकरेंचे वडिल माधवराव पाटणकरांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

News Desk

कोल्हापूरतून २ लाख तर सांगलीतून ४ लाख नागरिकांचे स्थलांतर

News Desk

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीत मोदी-सोनिया गांधीची घेणार भेट

swarit