HW News Marathi
महाराष्ट्र

माजी सहकारमंत्री विलासकाका उंडाळकर यांना अन्न, नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची श्रद्धांजली

मुंबई | काँग्रेसचे जेष्ठ नेते व राज्याचे माजी सहकारमंत्री विलासकाका उंडाळकर यांच्या निधनाबद्दल अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी शोक व्यक्त केला आहे. विलासकाका पाटील-उंडाळकर यांच्या निधनामुळे काँग्रेसने एक निष्ठावंत तर महाराष्ट्राने एक अत्यंत लोकप्रिय व अनुभवी नेतृत्व गमावले असल्याची भावना देखील मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे. विलासकाका यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहतानाच छगन भुजबळ म्हणाले की, विलासकाकांनी १९६२ मध्ये जिल्हा बँकेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश करुन कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचं त्यांनी सलग ३५ वर्षे प्रतिनिधित्व केलं.

पुरोगामी विचारांचे व काँग्रेसशी एकनिष्ठ असलेले नेते अशी त्यांची महाराष्ट्रभर ओळख होती. तब्बल १२ वर्षे मंत्री म्हणून त्यांनी वेगवेगळ्या खात्यांची धुरा सांभाळली होती. सहकार, विधी व न्याय आणि दुग्धविकास अशा अनेक खात्यांचे काम त्यांनी पाहिले होते. अनेक सहकारी संस्थांची उभारणीही त्यांनी केली होती. पश्चिम महाराष्ट्रात सहकार चळवळ रुजवण्यात त्यांचा मोठा हात होता. अश्या शब्दात छगन भुजबळ यांनी विलास काका उंडाळकर यांना श्रद्धांजली वाहिली व आम्ही सर्व उंडाळकर कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असल्याच्या भावना व्यक्त केल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खडकवासला ओव्हरफ्लोल, उजनीचा साठा वाढणार

News Desk

राष्ट्रवादीने देशातील पहिल्या ‘एलजीबीटी’ सेलची केली स्थापना

News Desk

नाशिक महापालिकेत शिवसेना गटनेत्याच्या कार्यालयाला आग

News Desk