मुंबई | मुंबईसह राज्यभरातील बहुतांश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर उत्सवावर विघ्न आले आहे. मुंबईतील प्रसिद्ध ‘लालबागचा राजा’ मंडळानेही गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना न करण्याचे ठरवले असताना भाजप नेते आशिष शेलार यांनी मात्र ‘लालबागचा राजा आणि भक्तांची ताटातूट करु नका’ अशी मागणी केली आहे.
“लालबागचा राजा आणि भक्तांची ताटातूट करु नका. कोकणातील चाकरमान्यांची आणि बाप्पाची भेट कशी होणार? याची आम्ही सरकारकडे विचारणा केली होती.” असे ट्वीट आशिष शेलार यांनी केले आहे. “सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना पुढे करुन चाकरमान्यांची कोंडी करण्याचा प्लॅन तयार केला? परस्पर घोषणा केली? सरकारला हे मान्य आहे का?” असे सवाल शेलार यांनी विचारले आहेत.
लालबागच्या राजाची आणि भक्तांची ताटातूट करु नका, तसेच कोकणातील चाकरमान्यांची आणि बाप्पाची भेट कशी होणार? याची आम्ही सरकारकडे विचारणा केली होती. सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना पुढे करुन चाकरमान्यांची कोंडी करण्याचा प्लॅन तयार केला? परस्पर घोषणा केली? सरकारला हे मान्य ?
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 10, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.