HW News Marathi
महाराष्ट्र

सत्ता ही विनयाने वापरायची असते !

मुंबई | राज्यात सध्या आघाडीचे सरकार आहे. या सरकारमध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. अशातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली आहे. याचे प्रोमो संजय राऊत त्यांच्या ट्विटर अकाऊंट वरून प्रसारित करत आहेत.

उद्धव ठाकरेंच्या कामाची पद्धत शिवसेनेची पद्धत आहे तसेच भाजपाच्या हातात सत्ता देणे शिवसेनेच्या हिताचे नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. ही मुलाखत उद्या (११ जुलै) प्रसिद्ध होणार आहे. संजय राऊत यांनी आज (१० जुलै) अजून एक प्रोमो शेअर केला असून यावेळी त्यांनी पोस्टमध्ये ‘सत्ता ही विनयाने वापरायची असते”, शरद पवार यांची जोरदार मुलाखत असे लिहिले आहे.

या प्रोमोमध्ये शरद पवारांनी काही महत्त्वाची विधाने केली आहे. “उद्धव ठाकरेंच्या कामाची पद्धत शिवसेनेची पद्धत आहे तसंच भाजपाच्या हातात सत्ता देणं शिवसेनेच्या हिताचे नाही,” असं शरद पवार बोलत असल्याचं दिसत आहे. तसंच राज्यात सत्ताकेंद्र एकच असलं पाहिजे असेही शरद पवारांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुशांतच्या मालमत्तेसाठी त्याला ड्रग्स दिले, प्रताप सरनाईकांचा दावा

News Desk

पुण्याच्या पाटील इस्टेट झोपडपट्टीला भीषण आग

News Desk

कृषि पणन मंडळाच्या नव्या स्वरुपातील मोबाईल अ‌ॅपचे पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

Aprna