मुंबई | पारनेरच्या ५ नगरसेवकांनी राष्ट्रवादीत जाऊन पुन्हा शिवसेनेत घरवापसी केली, मात्र राजकीय वर्तुळात शिवसेना-राष्ट्रवादीत नाराजी असल्याची थांबलेली नाही. या संपूर्ण प्रकरणावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मौन सोडले आहे. पक्षप्रवेशानंतर ते नगरसेवक सेनेचे असल्याचं समजलं, असा दावा अजितदादांनी केला.
“मी बारामतीमध्ये होतो आणि सध्याच्या या काळात कोणाला कोणाला जास्त जवळ येण्यास मनाई आहे. सगळ्यांना मी सोशल डिस्टन्स पाळण्यास सांगत आहोत. अशावेळी आमदार, नगरसेवक भेटायला येतात त्यांना आम्ही आधी प्राधान्य देतो कारण ते देखील प्रतिनिधीअसतात. त्यांची कामे करणे देखील तितकेच गरजेचे असते. अशावेळी तिथे काही गाड्या आल्या, आणि मला एक चिठ्ठी दिली आणि सांगितलं की काही अपक्ष नगरसेवक आहेत त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश करायचा आहे”.
मी बाहेर आलो, आणि सगळा कार्यक्रम पार पडला, नंतर मला कळलं की ते शिवसेनेचे होते. ते जात होते भाजपमध्ये. त्या नगरसेवकांना विचारण्यात आले त्यावर ते म्हणाले की राष्ट्रवादीला त्यांनी पहिले प्राधान्य दिले होते. राष्ट्रवादीने नाही घेतले तर आम्ही भाजपमध्ये जाणार. काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार १५ वर्षे होते. आमदार, नगरसेवक फोडण्याचे स्थानिक पातळीवर झाले. मात्र, इतक्या प्रमाणात कधी झाले नाही.
“त्या नगरसेवकांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी पाठवलं. तुमच्यावर काही अन्याय झाला असेल, किंवा तुमचं जे काही म्हणणं असेल, ते तुमचे वरिष्ठ सोडवतील, असं त्यांना सांगितलं. या बाबतीत कधीही मुख्यमंत्री नाराज नव्हते. ते मला कधीही काही बोलले नाहीत. माध्यमांनीच ते नाराज असल्याचं दाखवलं” असा दावाही अजित पवार यांनी केला.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.