HW News Marathi
व्हिडीओ

बलात्काराचा गुन्हा दाखल, मात्र मेहबूब शेख म्हणतात “तो मी नव्हेच !”, प्रकरण काय ?

राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर बलात्काराचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. १४ नोव्हेंबरला रात्री मेहबूब शेख यांनी भेटण्यासाठी बोलावून घेतलं आणि गाडीतून निर्जनस्थळी नेत बलात्कार केल्याची तरुणीची तक्रार आहे. तरुणीने औरंगाबादच्या सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून गुन्हा दाखल झाला आहे. औरंगाबाद पोलिसांनी तपास करण्यासाठी तीन पथकं तयार केली आहेत. दरम्यान मेहबूब शेख यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले होते.

औरंगाबाद पोलीस ठाण्यात मेहबूब इब्राहिम शेख याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष मेहबूब शेख यांनी या सगळ्या प्रकाराशी सबंध नसल्याचा खुलासा केला आहे. औरंगाबाद शहरात शिकवण्या घेणाऱ्या एका तरुणीला नोकरी लावण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. १४ नोव्हेंबरला रात्री ९ वाजण्याच्या सुमारास संबंधित तरुणीला महेबूब शेख याने भेटण्यासाठी बोलवून घेतले आणि त्यानंतर गाडीत बसवून निर्जन ठिकाणी नेत बलात्कार केला, अशी तक्रार संबंधित तरुणीने औरंगाबादच्या सिडको पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार सिडको पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

#MahebubShaikh #NCP #SharadPawar #RohitPawar #DhananjayMunde #Beed #MaheshTapase #Aurangabad #Maharashtra #BJP #PravinDarekar #ChitraWagh
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्य सरकार OBC आरक्षणासाठी काय पावलं उचलणार?, Ajit Pawar यांचे स्पष्टीकरण

News Desk

BJP च्या12 आमदारांचं निलंबन रद्द! पहा सत्ताधारी आणि विरोधकांच्या प्रतिक्रिया

News Desk

धनंजय मुंडेंची तक्रार घेऊन ‘हा’ नेता पवारांकडे, नेमकं काय आहे प्रकरण ?

News Desk