HW News Marathi
महाराष्ट्र

औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्यासाठी आमचा विरोध – बाळासाहेब थोरात 

मुंबई | औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर जोरदार हालचाली सुरु आहेत. औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांनी राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाकडे तसा प्रस्ताव पाठवला आहे. आता लवकरच शिवसेनेचं स्वप्न सत्यात येणार असल्याचं दिसत असताना महाआघाडीतील प्रमुख घटक कॉंग्रेसने या नामांतरणाला विरोध केला आहे.

कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी या नामांतरणाला विरोध करताना म्हटलं की, “संभाजीनगर नाव करण्याला आमचा विरोध असेल. महाविकास आघाडी विकासाच्या मुद्द्यावर स्थापन करण्यात आली आहे. सरकारनं सामान्य माणसाचं जीवन सुखी कसं होईल हे पाहायचं, हा कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या मुख्य हेतू आहे .महाविकास आघाडीच्या कॉमन मिनिमम प्रोग्राम मध्ये अशाप्रकारे शहरांचं नाव बदलण्याचं ठरलेलं नाही.”

“नाव बदलण्याचा हा अजेंडा आम्हाला मान्य नाही .नाव बदलावर काँग्रेसचा विश्वास नाही. शहराच्या नावात बदल करुन काही होत नाही, काही गोष्टींचा इतिहास बदलू शकत नाही. आम्ही विकासाची वाटचाल सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून करत आहोत, हे आमचे सूत्र आहे आणि हे राज्य घटनेच्या मूलभूत तत्त्वांना धरुन आहे. शहराच्या नावात बदल करणे ही गोष्ट आम्हाला मान्यच नाही. या प्रस्तावाला निश्चितच आमचा विरोध राहणार,” असे थोरात यांनी म्हटले आहे.

औरंगाबादचे नाव बदलून ते संभाजीनगर करण्यात यावं यासाठी 19 जून 1995 साली औरंगाबाद महापालिकेनं तसा प्रस्ताव पाठवला होता. राज्यात युतीची सत्ता असताना संभाजीनगर नावाची अधिसूचनाही काढण्यात आली होती. सरकारच्या या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करुन आव्हान देण्यात आलं होतं. सरकारला शहराचं नाव बदलण्याचा अधिकार आहे असं न्यायालयानं सांगत सरकारच्या बाजूनं निर्णय दिला. नंतरच्या काळात राज्यात पुन्हा सत्तेत आलेल्या आघाडी सरकारनं हा नाव बदलण्याचा प्रस्ताव मागे घेतला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“खंडण्या वसूल करणारा खरा सचिन वाझे मंत्रालयाच्या ६व्या मजल्यावर होता की सिल्वर ओकवर?”

News Desk

‘…खूप शॉपिंग करा’, अमृता फडणवीसांचा पुणेकरांना अनोखा सल्ला!

News Desk

डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निधनामुळे दूरदर्शी, शिस्तप्रिय व निष्ठावान नेतृत्व काळाच्या पडद्याआडः बाळासाहेब थोरात

News Desk