HW News Marathi
महाराष्ट्र

इंटरव्यूमध्ये इंटरेस्ट कोणाला नाही, खरं कौशल्य लढ्यामध्ये असतं बोलण्यामध्ये नाही – निलेश राणे

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाचे संपादक संजय राऊत यांनी मुलाखत घेतली आहे. ही मुलाखत लवकरच वृत्त वाहिन्यांवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच ही मुलाखत देशाच्या राजकारणात खळबळ माजवेल, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे. मात्र, कायमच आघाडी सरकारवर टीका करणारे भाजप नेते निलेश राणे यांनी या मुलाखतीवरही टीका केली आहे.

देश कुठल्या संकटात आहे आणि ह्यांच्या मुलाखती चालू आहेत, अशी टीका भाजपचे नेते निलेश राणे यांनी ट्विट करत केली आहे. निलेश राणे म्हणाले की, देश कुठल्या संकटात आहे आणि ह्यांच्या मुलाखती चालू आहेत. इतिहासामध्ये जाऊन काही गोष्टी आत्ता कळल्या तरी त्याचा कोणाला काय उपयोग? लोक चिडली आहेत, इंटरव्यूमध्ये इंटरेस्ट कोणाला नाही. तसेच, खरं कौशल्य लढ्यामध्ये असतं बोलण्यामध्ये नाही, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतील इमारतींच्या दुरूस्ती व पुनर्विकासासाठी शासन सदैव प्रयत्नशील! – डॉ.जितेंद्र आव्हाड

Aprna

डबेवाल्यांना लोकल प्रवास करताना QR कोड घेणे बंधनकारक

News Desk

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात साकारणार “पुस्तकांचे गाव”; कॅबिनेट बैठकीतील निर्णय

News Desk