HW News Marathi
महाराष्ट्र

अजितदादा ताबडतोब आमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाहीत, आठवलेंचा विश्वास

पुणे | “राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार पुन्हा एकदा साथ देतील आणि सरकार येईल, अशी आशा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना आहे, म्हणूनच ते ‘मी पुन्हा येईन’ असं म्हणतात” असं वक्तव्य रिपाई अध्यक्ष रामदास आठवले यांनी केलं आहे. काँग्रेसने पाठिंबा काढला की अजितदादा ताबडतोब आमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वासही आठवलेंनी व्यक्त केला. आगामी काळातील निवडणुकीत राज्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ताकदीने उतरणार असल्याचं रामदास आठवले यांनी जाहीर केलं आहे. त्यामूळे अजित पवार रामदास आठवलेंच्या या विश्वासाला पुर्ण करतात का हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

“राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल मला आदरच आहे. कारण त्यांच्यामुळे मी राजकारणात आलो. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस एका बाजूला आणि राष्ट्रवादी- शिवसेना दुसऱ्या बाजूला आहेत. या भांडणात काँग्रेस कधी पाठिंबा काढून घेईल, सोनिया गांधी कधी सूचना देतील, सांगता येत नाही. आणि काँग्रेसने पाठिंबा काढला रे काढला की अजितदादा ताबडतोब आमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाहीत” असा विश्वासही आठवलेंनी व्यक्त केला आहे.

“अजितदादांनी म्हटलं की, एक म्हणतोय (देवेंद्र फडणवीस) मी येईन, आणि दुसरा म्हणतोय (चंद्रकांत पाटील) मी जाईन. देवेंद्र फडणवीस मी येईन, अशासाठी म्हणतात, की अजितदादा एक दिवस त्यांच्यासोबत येतील, अशी त्यांना अपेक्षा आहे. अजितदादा एकदा तिथे जाऊन आलेले आहेत, त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना अपेक्षा आहे, की एक दिवस अजित पवार आपल्यासोबत येतील. आणि आपलं नवीन सरकार स्थापन करण्याची संधी आपल्याला मिळेल. अशी अपेक्षा असल्याने ते पुन्हा-पुन्हा सांगतात की मी पुन्हा येईन” असं रामदास आठवले म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आम्ही सरकार पाडणार नाही तर ,’अमर, अकबर आणि अँथनी’चे सरकार पायात अडकूनच पडेल

News Desk

कावेरी पाणी वाटपासाठी ३ मे रोजी सुप्रीम कोर्टाची पुढील सुनावणी

News Desk

‘भरचौकात थोबाडीत मारली तरी आम्ही सत्ता सोडणार नाही’, चंद्रकांत पाटलांचा कोणत्या मंत्र्याला इशारा?

News Desk