HW News Marathi
महाराष्ट्र

हो मला ईडीकडून चौकशीची नोटीस आली, खडसेंचा दुजोरा!

मुंबई | राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना ईडीकडून चौकशीची नोटीस देण्यात आली, अशी माहिती समोर येत आहे. दरम्यान, या बातमीली आधी एकनाथ खडसे यांनी अद्याप मला नोटीस नाही आली असं म्हटलं होते. मात्र, आता खडसे यांनी मला नोटीस मिळाली असे कबूल केले आहे आणि त्यामुळे या बातमीला खुद्द खडसेंकडूनच दुजोरा मिळाला आहे.

एकनाथ खडसे असं म्हणाले की, धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील अनेक कार्यकर्त्यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. ईडीची नोटीस आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभरातून मला जे फोन येत आहेत ती एक प्रकराची सहानुभूती दिली जात आहे. त्यामूळे लोकांना असं वाटतं आहे की हा एक प्रकारचा अन्याय आहे. वारंवार चौकशा करत राहणं लोकांना आवडलेलं दिसत नाही.

भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंना ईडीकडून नोटीस पाठवल्याचं वृत्त समोर येत आहे. वर्षाअखेरिला म्हणजे 30 डिसेंबरला खडसेंना चौकशीसाठी बोलावणं धाडल्याची माहिती आहे. आधी मला नोटीस मिळाली नसल्याचे खडसेंनी म्हटले होते आणि प्रतिक्रिया देण्यास नकार दिला होता. मात्र आता त्यांनीच दुजोरा दिल्यानंतर ३० तारखेला काय होणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वाढीव वीजबील प्रकरण : राज ठाकरेंनी उर्जामंत्र्यांविरोधात पोलिसांत तक्रार करण्याचे दिले आदेश

News Desk

“राज्यात कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करा”,अजित पवारांचे आवाहन

Aprna

हिंदुत्वाला विरोध करणाऱ्या काँग्रेसशी हातमिळवणी करताना लाज वाटली नव्हती का? – प्रसाद लाड

News Desk