HW News Marathi
व्हिडीओ

‘कोल्हापूरला जायला तुम्हाला बोलवलं होतं कुणी?’ अजित पवारांची चंद्रकांत पाटलांच्या विरोधात फटकेबाजी!

“कोल्हापुरात परत जायला तुम्हाला पुण्यात बोलवलंच कुणी होतं?”, असं म्हणत अजित पवार यांनी आपल्या खास अंदाजात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. ते पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलत होते. कोल्हापुरात परत जाण्याची तयारी असल्याचं विधान चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या एका कार्यक्रमात केलं होतं. चंद्रकांत पाटील यांच्या विधानाचा अजित पवार यांनी शेलक्या शब्दांत समाचार घेतला. “एक जण म्हणतो पुन्हा येईन, दुसरा म्हणजे परत जाईन. एकाला पुन्हा येईन काही जमलं नाही. आता हे म्हणतायत परत जाईन. अरे तुम्हाला पुण्यात बोलवलं कुणी होतं?”, असं अजित पवार म्हणाले.

#AjitPawar #ChandrakantPatil #DevendraFadnavis #BJP #Pune #Kolhapur #NCP #Kothrud #MedhaKulkarni #MahaVikasAghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Harish Salve यांचा Supreme Court मध्ये जोरदार युक्तिवाद; समोर आले महत्त्वाचे मुद्दे

Manasi Devkar

Uddhav Thackeray यांची मुलाखत म्हणजे WWF सारखी; Sandeep Deshpande यांची टीका

Seema Adhe

आरे कॉलनी परिसरात भीषण आग

News Desk