HW News Marathi
Covid-19

राष्ट्रवादीचे माजी विरोधी पक्षनेते आणि विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचे कोरोनामुळे निधन

पुणे | पिंपरी – चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते, तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. आज(४ जुलै) सकाळी चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात त्यांचे निधन झाले आहे.

लॉकडाऊनला सुरुवात झाली, तेव्हापासून दत्ता साने गरजूंना धान्य वाटप करत होते. अनेकांना आपापल्या गावी पाठवण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. लॉकडाऊन सुरु होऊन तीन महिने उलटले होते, तरीही साने यांनी मदतकार्यात खंड पडू दिला नव्हता. अशात ते अनेक गरजूंच्या संपर्कात येत होते.

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पिंपरी-चिंचवडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. पहिल्यांदा कोरोनाची सौम्य लक्षणे त्यांना दिसत होती. मात्र, त्यांनानंतर त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे. या दुःखद घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यभरात आतापर्यंत १० हजार ३१८ रुग्ण बरे होऊन घरी, एकूण रुग्ण ३९ हजार २९७ वर

News Desk

पीएम केअर फंडामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल माहिती देण्यास नकार

News Desk

राज्यात आता सात दिवसांचा ‘होम क्वारंटाईन’

Aprna