HW News Marathi
महाराष्ट्र

लॉकडाऊनवरुन राज्य सरकारमध्ये थोडेसे मतभेद असले तरी आम्ही मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी आहोत

नवी मुंबई | मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. मुंबई पाठोपाठ अता नवी मुंबईतदेखील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी काल (३ जुलै) नवी मुंबईत महापालिकेत बैठक घेतली.

या बैठकीत येत्या आठवडाभरात नवी मुंबईकरांसाठी दोन नव्या कोरोना टेस्ट लॅब सुरु करणार असल्याची माहिती आव्हाड यांनी दिली. त्यासोबत ऑक्सिजन सिलेंडर, व्हेंटिलेटर, औषध पुरवठा वाढवण्याचे आदेशही पालिका प्रशासनाला दिले.

यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी लॉकडाऊनवरुन आघाडीच्या सरकारमध्ये नाराजी नाट्यावर भाष्य केले. “लॉकडाऊनवरुन राज्य सरकारमध्ये थोडेसे मतभेद आहे. मात्र कोरोनाच्या परिस्थिती आम्ही पूर्ण ताकदीने मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी उभे असल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले.”

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुणे शिक्षक मतदारसंघात अखेर काँग्रेसचे जयंत आसगावकर विजयी

News Desk

रियाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी !

News Desk

एखाद्या विषयावर मतभेद असू शकतात पण महाविकासआघाडीत नाराजी नाही, राऊतांचं स्पष्टीकरण

News Desk