HW News Marathi
महाराष्ट्र

मनसेनेचा दणका! अ‍ॅमेझॉनचं पुण्यातील कार्यालय फोडले

पुणे | मनसे आणि अ‍ॅमेझॉनमधील वाद चिघळत चालला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस आल्यानंतर मनसे आक्रमक झाली असून अ‍ॅमेझॉनचं पुण्यातील कार्यालय फोडण्यात आलं आहे. पुण्यातील कोंढवा भागातील ॲमेझोनच्या कार्यालयाची मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली आहे. यावेळी कार्यकर्त्यांकडून ‘मराठी नाय तर अॅमेझॉन नाय’ अशी घोषणाबाजी करण्यात आली आहे.

मनसेने सुरु केलेल्या मराठी भाषेच्या मोहिमेविरोधात अ‍ॅमेझॉनने कोर्टात धाव घेतली आहे. यानंतर दिंडोशी कोर्टाकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. कोर्टाने राज ठाकरे आणि काही मनसे सचिवांना ५ जानेवारीला कोर्टात हजर राहण्याचा आदेश दिला आहे. राज ठाकरेंना नोटीस पाठवल्यानंतर मनसे नेते अखिल चित्रे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमुळे वाचले ‘त्या’ अपघातग्रस्त तरुणांचे प्राण

News Desk

‘राष्ट्रपती राजवटी’वरून शिवसेना जनतेची दिशाभूल करते, राम कदमचा राऊतांवर आरोप

News Desk

पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा विषय अनिवार्य करणार विधेयक मंजूर

News Desk