HW News Marathi
महाराष्ट्र

आपल्याला शिवसेनेबरोबर कायम राहायचे आहे त्यामूळे  स्थानिक‌ पातळीवर जमवून घ्या – अजित पवार

मुंबई | महाविकास आघाडीतील काही नेते ग्रामपंचायत निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचे सांगत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र आपल्या कार्यकर्त्यांना वेगळ्या सूचना दिल्या आहेत. आपल्याला शिवसेनेबरोबर कायम राहायचे आहे, त्यामुळे शिवसेनेबरोबर स्थानिक‌ पातळीवर जमवून घ्या, असे आदेश राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

“आपल्याला शिवसेनेबरोबर कायम राहायचे आहे. महाविकास आघाडी‌ झाल्यानंतर स्थनिक पातळीवर खटके उडत आहे, पण आपल्याला सेनेबरोबर जुळवून घ्यायचे आहे. त्यामुळे शिवसेनेबरोबर स्थानिक‌ पातळीवर जमवून घ्या” अशा सूचना अजित‌ पवारांनी आजच्या बैठकीत कार्यकर्त्यांना दिल्या. लवकरच महामंडळ वाटप करणार असल्याची माहितीही अजित पवार यांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रोहीत पवारांचे उपमुख्यमंत्र्यांना पत्र, पत्रातून केली ‘ही’ मागणी 

News Desk

मुंबई लोकल सामान्यांसाठी पुन्हा थांबणार? 

News Desk

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण

News Desk