HW News Marathi
देश / विदेश

भाजपला पहिल्यांदाच काश्मीर खोऱ्यातील तीन जागा मिळवण्यात यश

जम्मू काश्मीर | जम्मू-काश्मीरमध्ये फारुख अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील सात पक्षांच्या गुपकर आघाडीने जिल्हा विकास परिषदेच्या (डीस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) २८० जागांपैकी सर्वाधिक ११२ जागा जिंकल्या आहेत.पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, भाजप ७३ जागांवर विजय मिळवत सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे.भाजपने पहिल्यांदाच काश्मीर खोऱ्यातील तीन जागा जिंकल्या आहेत. त्यामूळे भाजपसाठी ही मोठी यशाची पायरी दिसत आहे.

आतापर्यंत ४७ अपक्ष उमेदवारांना विजयी घोषित केले आहे. तर सहा इतर जागांवरही अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत. तर जम्मू-काश्मीर अपनी पार्टी पक्षाची कामगिरी निराशाजनक असून पक्षाला ११ जागांवर विजय मिळवण्यात यश आले आहे. तर आणखी एका जागेवर पक्ष आघाडीवर आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने आतापर्यंत २२ जागा जिंकल्या असून ५ जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे.

केंद्र सरकारने गेल्या वर्षी जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यानंतर आणि राज्य केंद्र शासित प्रदेश बनल्यानंतर ही राज्यातील पहिलीच निवडणूक आहे.आठ टप्प्यात पार पडलेली डीडीसी निवडणूक २८ नोव्हेंबरपासून सुरू झाली होती.जम्मू-काश्मीर भागात १४० जागांवर निवडणुका पार पडल्या आहेत.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, मतमोजणीच्या एक दिवस आधी प्रशासनाने नईम अख्तर, सरताज मदनी, पीर मन्सूर आणि हिलाल अहमद लोन यांच्यासह अनेक पीडीपी आणि एनसी नेत्यांना ताब्यात घेतले होते. दरम्यान, त्यांना ताब्यात घेण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

काश्मीरमध्ये भाजपने तीन जागांवर विजय मिळवत आपले खाते उघडले आहे. श्रीनगरमधील खोनमोह-२, बांदीपोरा जिल्ह्यातील तुलाईल जागा आणि पुलवामामधील काकपोरा जागा अशा तीन जागा भाजपने जिंकल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आयुष्यात एकदा तरी पंढरीच्या वारीला जावे | नरेंद्र मोदी

swarit

Republic Day | हे आहेत आतापर्यंतचे परराष्ट्रीय प्रमुख पाहुणे

News Desk

ममता बॅनर्जींनी दिल्लीत घेतली नितीन गडकरींची भेट

News Desk