HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक

मुंबई | राज्यात कोरोनाची लाट काही अंशी ओसरली असल्यामुळे दिलासादायक वातावरण निर्माण झाले होते. पण, आता कोरोनाचा नवा प्रकार समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. राज्य सरकार हायअलर्टवर असून तातडीने रात्रीची संचारबंदी आजपासून (२२ डिसेंबर)लागू करण्यात आली आहे. ही संचारबंदी ५ जानेवारी पर्यंत असणार आहे. त्यानंतर आज (२२ डिसेंबर) लगेचच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने बैठक बोलावली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय अधिकारी यांच्याशी चर्चा करणार आहेत. कोविड १९ संसर्गची परिस्थिती तसंच नव्या कोविड विषाणूंपासून कराव्या लागणाऱ्या उपाय योजना यावर चर्चा होणार आहे. राज्यातील महानगरपालिकांमध्ये ५ जानेवारीपर्यंत रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबदी लागू करण्यात आली आहे. या नव्या उपाययोजनांचाही आढावा या बैठकीत घेण्यात येणार आहे. पुढील महिन्यात भारतात लसीकरणाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. या संदर्भात पूर्व नियोजनावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर ही रात्रीची संचारबंदी जाहीर केली आहे. त्याचबरोबर संपूर्ण युरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना विमानतळावर उतरल्यापासून १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचा तसेच अन्य देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या या नव्या विषाणूमुळे राज्यात अधिकची खबरदारी घेण्यात येत असून पुढील १५ दिवस अधिक सतर्क रहावे लागणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राहुल आणि प्रियांका गांधी पायी हाथरसला रवाना…

News Desk

संपूर्ण प्रशासनाचीच ‘वळसे-पाटील’ पॅटर्नने झाडाझडती होणे गरजेचे!

News Desk

#Coronavirus : राज्य सरकारला ‘या’ खात्यात मदत जमा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

swarit