HW News Marathi
महाराष्ट्र

‘वर्षा’वर देवेंद्र फडणवीसांच्या सामानाची बांधाबांध सुरू

मुंबई | राज्याच्या मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शपथ घेणार आहे. मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा आज (२८ नोव्हेंबर) मुंबईत शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्कवर सोहळा पार पडणार आहे. एकाबाजूला राज्याच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीची जय्यत तायरी सुरू असताना. मात्र, दुसऱ्या बाजुला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा बंगला रिकामा करण्याची लगबग सुरू आहे. फडणवीस यांचे घरतील साहित्य घेऊन जाण्यासाठी वर्षा बंगल्यावर टेम्पो आले आहेत.

बिगरकाँग्रेसी म्हणून २०१४ पासून ते २०१९ पर्यंत पाच वर्ष पूर्ण करणारे फडणवीस हे मुख्यमंत्री राहिले आहेत. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी बहुमत सिद्ध न करू शकल्यामुळे राज्यात १२ नोव्हेंबरला राष्ट्रपती राजवट लागू झाली होती. त्यामुळे मंत्र्यांना आपले बंगले रिकामे करावे लागले होते. पण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मुक्काम आणखी तीन महिने वर्षा बंगल्यातच राहील असे त्यावेळी सांगण्यात आले होते. शपथ विधीपूर्वी सकाळी पाहाटे राष्ट्रपती राजवट हटवण्यात होती. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (२३ नोव्हेंबर) सकाळी राजभवनावर जाऊन मुख्यमंत्री तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

या घटनेने राज्यातील राजकारणाने वेगळे वळण घेतले आहे. यानंतर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीने भाजपच्या सत्तास्थापनेच्या दावा सवाल उपस्थित करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेशानुसार, विधीमंडळाचे काल (२७ नोव्हेंबर) विशेष अधिवेशन बोलविण्यात आले होते. मात्र, त्यापूर्वीच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिली. शसकीय नियमानुसार नव्या मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर राहण्यास येण्यापूर्वी मावळत्या मुख्यमंत्र्यांनी शासकीय निवास्थान रिकामे करावे लागेत. मात्र, फडणवीसांनी राजीनामा दिल्यापासून सोशल मीडियावर वर्षा बंगला सोडण्याबाबतचे मीम्स व्हायरल होत आहेत. काही मीम्समध्ये वर्षा मी परत येईल, तर काहींमध्ये फडणवीस घरातील साहित्यांची आवराआवर सुरू केली आहे.

विधानसभेचे विरोधीपक्षनेते म्हणून भाजप देवेंद्र फडणवीस यांचीच नियुक्ती करणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे विरोधीपक्षनेते म्हणून त्यांना घर नक्कीच मिळेल पण त्या घराचा ऑफिस म्हणून फक्त कामांसाठीच वापर केला जाईल. नागपूरकर असल्याने देवेंद्र फडणवीसांचे नागपूरमध्ये धरमपेठेत अगदी वडिल आमदार असल्यापासूनचे हक्काचे घर आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षणातील काही खटले मागे घेण्याचा राज्य सरकारचा निर्णय

News Desk

…ही तर ओबीसींची फसवणूक; आरक्षणाला धोका देण्याचाही प्रयत्न! – पंकजा मुंडे

Aprna

मनसे कार्यकर्त्यांना शिवीगाळ करणाऱ्या ‘त्या’ पोलिस अधिकाऱ्याला निलंबित करा, मनसेची मागणी

News Desk