HW News Marathi
Covid-19

Unlock 2 : मुंबईकरांसाठी ‘मिशन बिगीन अगेन’च्या दुसऱ्या टप्प्यातील मार्गदर्शक तत्वे जारी

मुंबई | महाराष्ट्रात पुनश्च हरि ओम म्हणजे ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत आता दुसऱ्या टप्प्यासाठी अनेक परवानग्या मिळाल्या आहेत. मात्र, मुंबई पोलिसांनी प्रत्येक नागरिकासाठी दोन किमीची ‘लक्ष्मणरेषा’ आखून दिली आहे. कोविड-१९ चा धोका अजूनही कायम असल्याने सर्वांनी सुरक्षेसाठी वैयक्तिक काळजी आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. राज्य शासनाने नागरिकांच्या आरोग्यासाठी मार्गदर्शक तत्वांचे टेकोरपणे पालन करावे आणि खालील नियम पाळावेत असे मुंबई आवाहन पोलिसांनी सर्वांना केले आहे.

मुंबईत काल (२८ जून) मुंबई पोलिसांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे आहे की, २८ जून रोजी ७००० हून अधिक नागरिकांनी औपचारिक/वैद्यकीय कारण किंवा आपत्कालीन परिस्थिती नसताना वाहने बाहेर काढून टप्प्याटप्प्याने होत असलेल्या अनलॉकच्या नियमांचे उल्लंघन केले. शहर व्यवस्थितपणे ‘अनलॉक’ करण्यासाठी मुंबईकर सर्व नियमांचे पालन करून आम्हाला साथ देतील अशी आम्ही आशा करतो.

असे आहेत निर्बंध

१. घराबाहेरील हालचाली केवळ अत्यावश्यक सेवांसाठीच कराव्यात.

२. घराबाहेर फिरताना चेहऱ्यावर मास्क अनिवार्य आहे.

३. घरापासून फक्त २ किमीच्या परिसरात असलेल्या बाजारपेठ, दुकाने इत्यादी ठिकाणी जाता येईल. २ किमीच्या बाहेर जाऊ नये.

४. व्यायामाची परवानगी घरापासून २ किमीच्या परिघातील मोकळ्या जागेपुरतीच मर्यादित आहे.

५. कार्यालय किंवा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीतच २ किमीच्या बाहेर जाण्याची परवानगी आहे.

६. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.

७. वरील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.

८. सोशल डिस्टन्सिंगचे निकष न पाळणारी दुकाने इत्यादी बंद करण्यात येतील.

९. रात्री ९ ते पहाटे ५ या वेळेत असलेल्या कर्फ्यूमध्ये अत्यावश्यक सेवेशिवाय इतर व्यक्तींनी बाहेर फिरल्यास कडक कारवाई केली जाईल.

१०. वैध कारणाशिवाय आपल्या स्थानिक भागापासून दूर आढळून येणारी सर्व वाहने जप्त केली जातील.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यात रुग्ण बरे होणाऱ्यांचे प्रमाण ८२.९४ टक्के…

News Desk

#Coronavirus : धारावीत कोरोनाबाधितांच्या आकड्यात वाढ सुरुच

News Desk

नागरिकांनी नियम पाळा, कडक निर्णय घ्यायला भाग पाडू नका! – अजित पवार

Aprna