मुंबई | मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा शिवाजी पार्कात घेण्याची प्रथा बनवू नका, असा सल्ला मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क येथे होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात २०१० साली शिवाजी पार्कसंदर्भाततील एका याचिकेवर आज (२७ नोव्हेंबर) सुनावणी सुरू होती.
Uddhav Thackeray, Shiv Sena chief and the leader of 'Maha Vikas Aghadi' will take oath as the Chief Minister of #Maharashtra tomorrow, the swearing-in ceremony will be held at Shivaji Park in Mumbai. https://t.co/4Yd0pFUDyd
— ANI (@ANI) November 27, 2019
शिवाजी पार्कमध्ये होणारे भव्य कार्यक्रमांमुळे शांतता भंग होते. त्यामुळे शिवाजी पार्क हे ‘शांतता क्षेत्र’ असल्याने याठिकाणी लाऊडस्पीकरचा वापर करता येत नसल्याचे सांगत ‘वेकॉम ट्रस्ट’ने मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला होता. या याचिकेवर सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने सल्ला दिला आहे. या याचिकेवर सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयानाे उद्या शिवाजी पार्कात होणाऱ्या शपथविधी सोहळासंदर्भात म्हणाले की, मुख्यमंत्री शपथविधी सोहळा शिवाजी पार्कात घेण्याची प्रथा बनवू नका, असा सल्ला सरकारला दिला आहे. न्या. एस. सी. धर्माधिकारी आणि न्या. आर. आई. छागला यांच्या खंडपीठाने आज सुनावणीदरम्यान हा सल्ला दिला.
देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर महाविकासआघाडचे उद्धव ठाकरे नेतृत्व करणार असल्याचे निश्चित झाले आहे. महाविकासआघाडीचे काल (२६ नोव्हेंबर) ट्रायंडट हॉटेलमध्ये बैठक घेण्यात आली. याबैठकीत राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला सर्व नेत्यांनी अनुमोदन दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलविण्यात आले. या अधिवेशनात २८८ पैकी २८६ आमदारांनी शपथ देण्यात आली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.