HW News Marathi
Covid-19

साताऱ्यात शिवेंद्रराजेंनी घेतली शरद पवार अन् अजित पवारांची भेट

सातारा | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज (२७ जून) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार हे साताऱ्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी शरद पवार आणि अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीबाबत बोलताना शिवेंद्रराजे म्हणाले कि,”एखाद्या तालुक्याची समस्या, शहराचा प्रश्न विकासकामे याबाबतीत उपमुख्यमंत्री अजित पवार कधीही राजकारण करत नाही. विकासकामांना ते कधीही राजकारणाच्या नजरेतून पाहत नाहीत.” दरम्यान, शिवेंद्रराजेंनी घेतलेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगत असल्या तरीही या भेटीत प्रामुख्याने ‘मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांवर’चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

“सातारा एमआयडीसीतील बजाजचा महाराष्ट्र स्कूटरचा उद्योग सुरु करावा. बजाजच्या ताब्यात सर्वात जास्त म्हणजे तब्बल ४० एकराची जमीन आहे. तर इथे लोकांना कारखाने उभारायला जागा नाही. त्यामुळे एकत्र त्यांनी या जमिनीचे काहीतरी करावे किंवा ती जमीन थेट एमआयडीसीकडे हस्तांतरित करावी, अशी मागणी शिवेंद्रराजेंनी यावेळी अजित पवारांकडे केली आहे. शिवेंद्रराजेंनी हे स्पष्ट केले कि, यावेळी शरद पवार आणि अजित पवारांशी मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा झाली आहे. शिवेंद्रराजेंनी जिल्हा बँक, एमआयडीसी, वैद्यकीय महाविद्यालय यांसह प्रलंबित प्रश्नांसंदर्भात या यावेळी निवेदन दिल्याचे वृत्त आहे.

टीका मुद्देसूद असावी, व्यक्तिगत पातळीवर जाऊन टीका होऊ नये !

शिवेंद्रराजेंनी साताऱ्यात २ वेगवेगळ्या ठिकाणी शरद पवार आणि अजित पवारांची भेट घेतली आहे. दरम्यान, यानंतर शिवेंद्रराजेंनी भाजपचे नवनिर्वाचित विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर देखील भाष्य केले आहे. “गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याबाबत आमचे नेते देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केले आहे. जे झाले ते योग्य नाहीच. टीका देखील मुद्देसूद असावी, व्यक्तिगत पातळीवर जाऊन टीका होऊ नये”, असे शिवेंद्रराजे यावेळी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारत-अमेरिका ‘कोरोना’वर लस विकसित करणार !

News Desk

…तोपर्यंत मुंबई अनलॉक करणं घातक, पालकमंत्र्यांचं वक्तव्य

News Desk

परळी वैजनाथ येथील महाशिवरात्र यात्रा उत्सव रद्द करीत असल्याचे जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांचे आदेश…

News Desk