HW News Marathi
देश / विदेश

प्रताप सरनाईकांना आणखी एक धक्का ! पूर्वेश सरनाईकही ED च्या निशाण्यावर

मुंबई । शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि यांचे पुत्र विहंग सरनाईक हे गेल्या काही दिवसांपासून ईडीच्या निशाण्यावर असताना सरनाईक कुटुंबाला आणखी एक धक्का मिळाला आहे. प्रताप सरनाईक यांचे धाकटे पुत्र पुर्वेश सरनाईक यांना देखील ईडीकडून नोटीस धाडण्यात आली आहे. पूर्वेश सरनाईक यांना ईडीकडून सोमवारी (१४ डिसेंबर) कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ईडीकडून २४ नोव्हेंबर रोजी प्रताप सरनाईक यांच्या घरासह, विंहग आणि पूर्वेश यांच्या घर आणि कार्यालयावर धाड टाकण्यात आली होती. त्या धाडीमध्ये ईडीला पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, त्याबाबत स्पष्टीकरण देताना प्रताप सरनाईक म्हणाले होते की, “माझ्या घरी कोणत्याही प्रकारचे पाकिस्तानी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड सापडलेले नाही. पाकिस्तानच्या विरोधात अनेक वर्षांपासून लढणाऱ्या प्रताप सरनाईंकांकडे पाकिस्तानचे क्रेडिट कार्ड सापडल्याच्या बातम्या प्रसारित केल्या जात आहेत. अशा खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांविरोधात कारवाई करणार आहे.”

दरम्यान, यापूर्वी प्रताप आणि विहंग सरनाईक यांना ईडीने चौकशी करता ताब्यात घेतले होते. त्यावेळी जवळपास ४ ते ५ तास चौकशी झाली होती. त्यानंतर आता पूर्वेश सरनाईक देखील थेट ईडीच्या निशाण्यावर आल्याने सरनाईक कुटुंबासह शिवसेनेसाठी हा मोठा धक्का आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अंतराळात भारताचे सर्जिकल स्ट्राइक, ‘मिशन शक्ती’ला मोठे यश

News Desk

विकतचे दुखणे घेऊन सरकार कसले राजकारण करीत आहे?, सामनातून मोदी सरकारला सवाल

News Desk

विमान दुर्घटनेत पर्यटन मंत्री रबींद्र अधिकारीसह ५ जणांचा मृत्यू

News Desk