HW News Marathi
HW एक्सक्लुसिव

राजकारणातली सर्वात मोठी घडामोड, शरद पवार UPAचे अध्यक्ष होणार ?

नवी दिल्ली | देशातील राजकारण सध्या अनेक विषयांनी गुरफटलेले आहे. एकीकडे केंद्र सरकारने कृषी कायदे लागू केल्याने शेतकरी असंतुष्ट आहेत,अशा परिस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली होती. त्यांनतर आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात एक मोठी घडामोड घडत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना युपीए अध्यक्ष करण्याची काँग्रेसनं तयारी सुरू केली आहे. दरम्यान, युपीएचे अध्यक्ष पद सध्या सोनिया गांधी यांच्याकडे आहे. आणि आता त्या आपल्या पदावरुन राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जात आहे. त्यांच्या पदावर योग्य दावेदार म्हणून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. शरद पवार यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रासारखी महाविकास आघाडी राष्ट्रीय पातळीवर करावी अशी मागणी होते आहे.विशेष म्हणजे याबाबत काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रस्ताव शरद पवार यांना दिल्याची माहिती मिळाली आहे. विरोधी पक्षाला एकत्र करुन आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये संयुक्त पुरोगामी आघाडीचं (UPA) नेतृत्व शरद पवार यांनी करावं, असं काँग्रेसनं प्रस्तावात म्हटलं आहे. शरद पवार यांना फक्त युपीए चेअरमन नाही तर पुढच्या लोकसभेचा पंतप्रधानपदाता चेहरा म्हणूनही पाहिल जातयं . तसं पाहिलं तर देशात पुढील लोकसभा निवडणुकीसाठी अजून साडेतीन वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. आता लोकसभा निवडणुका २०२३ मध्ये होतील. मात्र, आतापासून काँग्रेसनं यासाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. दरम्यान, गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी यांना यूपीएकडून पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून पुढे करण्यात आलं होतं. मात्र, भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध राहुल गांधी यांचा टिकाव लागला नाही. २०१४ प्रमाणे २०१९ मध्येही काँग्रेसला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. नंतर पक्षांतर्गत वाढत्या दबाबामुळे राहुल गांधी यांना अध्यक्षपदाचाही त्याग करावा लागला होता #SharadPawar #UPA #SoniaGandhi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधानसभेचं Special Session बोलवण्याचा अधिकार कोणाला ? कायदा काय सांगतो ?

News Desk

Afghanistan Taliban News:अफगाणिस्तानमध्ये ४ वर्षे राहिलेल्या लेखिका प्रतिभा रानडे यांचे अनुभव

News Desk

Nitesh Rane And Balasaheb Tahckeray | ‘बाळासाहेब’ असते तर मला शाबासकी दिली असती ..!

Arati More