HW News Marathi
राजकारण

शिवसेनेशिवाय कोणीही सत्ता स्थापन करू शकणार नाही !

मुंबई | “शिवसेनेशिवाय राज्यात कोणताही पक्ष सत्ता स्थापन करू शकणार नाही. राज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार”, असा इशारा वजा दावा शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकांच्या निकालांपासून राज्यात सत्तास्थापनेवरून निर्माण झालेला तिढा अद्याप सुटण्याचे नाव घेत नाही. एकीकडे राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रावादी काँग्रेस हे महाशिवआघाडीचे सरकार स्थापन होण्याच्या दिशेने वाटचाल सुरु असली तरीही अद्याप याबाबत कोणताही स्पष्ट खुलासा, स्पष्ट भूमिका मांडली जात नसल्याने राज्यातील ‘महाशिवआघाडी’बाबत आता मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर, “काहीही झाले तरीही राज्यात शिवसेनेशिवाय कोणीही सरकार स्थापन करू शकणार नाही”, असे रावते म्हणाले.

“राज्यात अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळावी शिवसेनेसाठी राज्यातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांसाठी मदत केंद्र सुरू करण्यात आली आहेत”, अशी माहिती दिवाकर रावते यांनी दिली. याच पार्श्वभूमीवर, औरंगाबादमधील मदतकेंद्रांना भेट देण्यासाठी गेलेल्या दिवाकर रावते यांनी यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यातील सत्तास्थापनेसंदर्भात शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे. “महाआघाडी असो किंवा युती शिवसेनेशिवाय कोणताही पक्ष राज्यात सत्ता स्थापन करू शकणार नाही. राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री केल्याशिवाय कोणत्याही पक्षाची सत्ता येऊ शकत नाही”, असे विधान दिवाकर रावते यांनी केले आहे.

शरद पवार यांनी सोमवारी (१७ नोव्हेंबर) दिल्लीत सोनिया गांधींशी घेतलेल्या भेटीनंतर माध्यमांसमोर दिलेल्या प्रतिक्रियेनंतर राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली. “आमच्या बैठकीत शिवसेनेबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. महाशिवआघाडीबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. समन्वय समितीची कोणतीही बैठक झालेली नाही, होणार नाही. आमचे ५४ आमदार, सरकार कसे बनविणार ?”, अशी वक्तव्ये यावेळी शरद पवारांनी केली. त्यामुळे, महाशिवाघडी बाबतीतला संभ्रम आणखी वाढला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सफाई कर्मचाऱ्यांचे पाय धुतले

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळीच्या भावाचा शिवसेनेत गटात प्रवेश

Aprna

भाजप म्हणजे खडसेंसाठी जीना यहाँ, मरना यहाँ

News Desk