HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेनेबाबत चर्चाच नाही, राज्यात महाशिवआघाडीचा सस्पेंस कायम

नवी दिल्ली | राज्यात सत्ता स्थापनेसंदर्भात शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत कोणताही निर्णय झाला नाही, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. पवार पुढे म्हणाले की, आम्ही फक्त राज्यातील परिस्थितीवर लक्ष ठेवून राहणार, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. आज (१८ नोव्हेंबर) काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.

तसेच ज्यांच्याकडे संख्याबळ आहे त्यांनी सरकार स्थापन करावे, असे सूचक विधान पवारांनी पत्रकार परिषदेत केले आहे. एकसूत्री कार्यक्रमासाठी समन्व समितीची कुठीही बैठक नाही, असा दावा देखील पवारांनी यावेळी केला आहे. त्याचप्रमाणे आघाडीतल्या मित्रपक्षांना नाराज करणार नाही, असे देखील पवार म्हणाले. सोनिया गांधी यांच्या भेटीत फक्त काँग्रेस-राष्ट्रवादी संबंधी चर्चा झाल्याचे पवारांनी सांगितले.

राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना या महाशिवआघाडीच्या सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेटी घेतली. या दोघांची जवळपास ५० मिनिटे भेट झाली असून या भेटीनंतर पत्रकार परिषदेत राज्यात सत्ता स्थापनेसंदर्भात कोणताही निर्णय झाला नाही, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

काय म्हणाले शरद पवार ?

  • शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत कोणतीही चर्चा नाही.
  • एकसूत्री कार्यक्रमासाठी समन्वय समितीची कोणतीही बैठक झालेली नाही.
  • समन्वय समितीची कोणतीही बैठक होणार नाही.
  • आघाडीच्या मित्रपक्षांना नाराज करणार नाही.
  • आमचे ५४ आमदार, सरकार कसे बनविणार ?
  • केवळ राज्यातील राजकीय स्थितीवर आम्ही लक्ष ठेऊन आहोत.
  • सोनियांना भेटलो पण सत्तास्थापनेवर चर्चा नाही.
  • शिवसेनेसंबंधी सोनियांशी चर्चा नाही.
  • आम्ही तर तुम्हा पत्रकारांसोबत आहोत.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात व राज्यात पुन्हा काँग्रेसचे सरकार आणू! – बाळासाहेब थोरात

News Desk

राज्यपालांनी त्यांच्या मांडीखाली दाबून ठेवलेले १२ राज्यपाल नियुक्त सदस्य मोकळे करावेत!  

News Desk

आंदोलनकर्त्यांनी सांगलीत थेट गोकुळ दूध संघाचा दूध टँकर फोडला 

News Desk