HW News Marathi
Covid-19

रामदेव बाबा यांनी कोरोनावर मात करण्यासाठी पहिले आयुर्वेदिक औषध केले लॉन्च

मुंबई | संपूर्ण जगात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. जगभरात कोरोनावर औषध शोधण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला भारतात योग योगगुरु रामदेव बाबा यांनी कोरोना पहिले आयुर्वेदिक औषध लॉन्च केले आहे. या औषधामुळे १०० टक्के रुग्ण बरे होतात आणि ० टक्के मृत्यूदर असल्याचाही दावा रामदेव बाबा यांनी केला आहे. रामदेव बाबा यांनी हरिद्वार येथे औषधाचे आज (२३ जून) उद्धाटन केले. रामदेव बाबाच्या औषधाचे नाव कोरोनील आणि श्वासारीचे असे आहे.

रामदेव बाबा म्हणाले, “आज आम्ही कोरोनील आणि श्वासारीचं लाँचिंग करत आहोत. या औषधांवर आम्ही दोन प्रयोग केले. एक ‘क्लिनिकल कंट्रोल स्टडी’ आणि दुसरा ‘क्लिनिकल कंट्रोल ट्रायल’. पहिला प्रयोग देशभरातील विविध शहरांमध्ये करण्यात आला. आम्ही २८० रुग्णांचा यात समावेश केला. याचा निकाल अप्रतिम होता. यात १०० टक्के रुग्णांची रिकव्हरी झाली. एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. आम्ही सिप्टेमेटिक उपचारासोबत सिस्टमेटिक उपचार देखील केले. यातून आम्ही कोरोनाची गुंतागुंत असतानाही त्याला नियंत्रित केले.”

“संपूर्ण सायंटिफिक डॉक्यूमेंटच्या आधारे श्वासारी वटी, कोरोनिल ही कोरोनावरील एविडेंस बेस असलेले पहिले आयुर्वेदिक औषध आहे. पतंजलीच्या मते, हा रिसर्च संयुक्तपणे पतंजली रिसर्च इंस्टीट्यूट (पीआरआय) हरिद्वार, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंस (NIMS), जयपूरने केला आहे. या औषधाची निर्मिती दिव्य फार्मसी, हरिद्वार आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेड, हरिद्वारकडून केली जात आहे.”

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खुशखबर ! मुंबईत ५ ऑगस्टपासून सर्व दुकानच सुरु करण्यास परवानगी

News Desk

राज्यासंबंधित या मुद्द्यावर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र ?

News Desk

मुंबईत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता मद्यविक्रीसह इतर सर्व दुकाने बंदच राहणार

News Desk