HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात आज ७ हजारांहून अधिक ‘कोरोनामुक्त’

मुंबई । राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्रातील कोरोनास्थितीची माहिती दिली आहे. आरोग्यमंत्र्यांनी आज (७ सप्टेंबर) दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज ३ हजार ७५ कोरोनाबधितांची वाढ झाली आहे. तर याच एका दिवसात ७ हजार ३४५ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. नव्या कोरोनाबाधितांच्या आकड्याच्या तुलनेत राज्यात कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा दिलासादायक आहे.

राज्यात आतापर्यंत एकूण तब्बल १७ लाख ३० हजार ७१५ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. तर सद्यस्थितीत राज्यात एकूण ७५ हजार ७६७ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९३.९८% झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सांगलीत बचावकार्यादरम्यान बोट उलटून ९ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता

News Desk

अंबड शहरातील भुयारी गटार प्रकल्पासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून निधी! – एकनाथ शिंदे

Aprna

अलमट्टी धरणावर बंधारे बांधल्यास कोल्हापूर–सांगली जिल्ह्यात विपरीत परिणाम; कर्नाटक सरकारला तात्काळ वस्तुस्थिती कळविणार! – उपमुख्यमंत्री

Aprna