नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयाकडून राम जन्मभूमी आणि बाबरी मशीदी प्रकरणी देण्यात आलेल्या ऐतिहासिक निकालाला आव्हान देण्यासाठी आता ‘मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डा’कडून फेरविचार याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. ‘मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डा’च्या आज (१७ नोव्हेंबर) लखनौमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन हि माहिती देण्यात आली आहे. “सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी दिलेला निकाल हा मुस्लिमविरोधी आहे. आमची ही याचिका फेटाळली जाईल हे देखील आम्हाला माहित आहे. परंतु, याचिका दाखल करणे हा आमचा अधिकार आहे”, असेही मुस्लिम लॉ बोर्डाकडून यावेळी सांगण्यात आले आहे.
Syed Qasim Rasool Ilyas, All India Muslim Personal Law Board (AIMPLB): The Board has decided to file a review petition regarding Supreme Court's verdict on Ayodhya case. pic.twitter.com/fV6M2Lifhc
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) November 17, 2019
सविस्तर वृत्त लवकरच…
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.