मुंबई | राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर कोणताही पक्ष राज्यात सत्तास्थापनेचा दावा करण्यात यशस्वी न ठरल्याने अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. राज्यात एकीकडे सत्तासंघर्ष सुरु असताना दुसरीकडे राज्यातील शेतकरी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर प्रचंड हवालदिल झाला आहे. राज्यात सरकारच स्थापन न झाल्याने गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत होते. मात्र, आज (१६ नोव्हेंबर) अखेर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या २ हेक्टर पर्यंतच्या शेतीमालाकरिता राज्यपालांकडून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.
राज्यपालांकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर
- नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या खरीप पिकांसाठी प्रति हेक्टर ८,००० रुपयांची मदत
- फळ-बागायतींसाठी प्रति हेक्टर १८,००० रुपयांची मदत जाहीर
- नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या मुलांची शाळा-महाविद्यालयांची परीक्षा फी माफ
Raj Bhavan Press Release 16 November 2019 pic.twitter.com/wIuu3OCxt4
— Governor of Maharashtra (@maha_governor) November 16, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.