HW News Marathi
महाराष्ट्र

अजित पवार ,शरद पवार,धनंयज मुंडे यांनी संजय राऊत  यांची घेतली खासमखास भेट !

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांची आज (६ डिसेंबर) भेट घेतली. संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी शरद पवार यांच्याकडून ही भेट घेण्यात आली होती. त्यामूळे राजकिय वर्तुळात या चर्चांना वेगळे वळण देत असले तरी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी प्रामुख्याने ही भेट घेण्यात आली होती.

दरम्यान,शरद पवार-संजय राऊत यांच्या भेटीदरम्यान शेतकरी आंदोलनाच्या बाबतीत चर्चा झाली असे म्हटले जात आहे. नुकतंच संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली होती. यानंतर काल (५ डिसेंबर) संजय राऊत यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. २ डिसेंबरला संजय राऊत लीलावती रुग्णालयात दाखल झाले होते. गेल्या वर्षी देखील नोव्हेंबर महिन्यात संजय राऊत यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील विधानपरिषदेच्या चार जागा बिनविरोधी तर दोन जागांसाठी होणार लढत

News Desk

“सामनाचं नाव आता पाकिस्ताननामा किंवा बाबरनामा करा”- आशिष शेलार

News Desk

राज्यात सत्तेसाठी केलेली युती महाराष्ट्राला पटणारी नाही !

News Desk