HW News Marathi
महाराष्ट्र

“सरकारमध्ये सांगून येणार नाही आता डायरेक्ट कृतीच करणार” दरेकरांचं वक्तव्य ! “मिशन कमळ” ?

सोलापूर | महाराष्ट्रात महाविकासआघाडी सरकार स्थापन झाल्यापासून ते सरकार लवकरचं पडणार अशा अनेक बातम्या येत असतात.आता भाजपचे विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांनी भाजपच्या ‘मिशन कमळ’ बाबत अत्यंत सूचक वक्तव्य केले आहे. आम्ही तर सरकारमध्ये येणारच आहोत फक्त कधी ते सांगणार नाही आता डायरेक्ट कृतीच करणारं असं वक्तव्य विधानपरिषद विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये केलं आहे.

महाविकास आघाडी सरकारला भारतीय जनता पार्टीच्या ताकदीची भीती वाटत असल्याने तीन विभिन्न विचाराच्या पक्षांना इच्छा नसतानाही एकत्र राहावंच लागत आहे असही दरेकर म्हणाले.

दरम्यान नुकत्याच जाहीर झालेल्या विधानपरिषदांच्या निवडणूक निकालामध्ये भाजपला अपेक्षित यश मिळालं नाहीये त्यावर बोलताना, महाविकास आघाडीने यामुळे अर्ध्या हळकुंडाने पिवळं होऊ नये आणखी खूप निवडणुका बाकी आहेत,विधानपरिषदेची निवडणुक ही एक छोटीशी चकमक होती आणखी महत्वाची लढाई बाकी आहे,असही दरेकर म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“ए तू चूप”, चंद्रकांत पाटलांची पूरग्रस्तांना दमदाटी

News Desk

देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील एकाच गाडीत, व्यासपीठावरही गुजगोष्टी!

News Desk

राज्यपालांच्या वाक्यावरुन वाद घालण्याची ही वेळ आहे का? आधी शेतकऱ्यांकडे लक्ष द्या –  देवेंद्र फडणवीस

News Desk