नवी दिल्ली | भारत-चीन सीमासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर काल (१९ जून) पंतप्रधान मोदी यांची सर्वपक्षीय बैठक पार पडली. दरम्यान, या बैठकीनंतर पंतप्रधानांनी याबाबत एक मोठा वक्तव्य केले.”चिनी सैन्य भारताच्या हद्दीत घुसलेच नाही”, असे विधान पंतप्रधानांनी केले होते. त्यानंतर सर्वच स्तरांतून मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित केले गेले आणि प्रचंड टीकाही झाली. मात्र, आज (२० जून) पंतप्रधान कार्यालयाकडून आता याबाबतचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. “पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. एलएसीवर (LAC) भारतीय सैन्याच्या १६ बिहार रेजिमेंटच्या जवानांनी शौर्य दाखवत चीनचा डाव उधळून लावला. त्यामुळेच चीनला भारताच्या हद्दीत घुसता आले नाही, असे विधान पंतप्रधानांनी केले होते”, असे स्पष्टीकरण पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आले आहे.
Attempts are being made in some quarters to give a mischievous interpretation to remarks by the PM @narendramodi at All-Party Meeting yesterday
PM was clear that India would respond firmly to any attempts to transgress the Line of Actual Control
(1/n)
— PIB India (@PIB_India) June 20, 2020
“आपले सैन्य आपल्या रक्षणासाठी सीमेवर तैनात असताना त्यांचे मनोधैर्य वाढविणे आवश्यक आहे. ते सोडून उलट अशा पद्धतीची वक्तव्ये करणे दुर्दैवी आहे. पंतप्रधानांच्या विधानावरुन कोणीही वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरीही भारतीयांची एकजूट कमी होऊ शकणार नाही”, असेही पंतप्रधान कार्यालयाकडून म्हणण्यात आले आहे. देशातील तब्बल २० पक्षांसोबत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर पंतप्रधानांनी आपल्या निवेदनात “चीनचे सैन्य भारतीय हद्दीत घुसलेच नाही”,असा दावा केला होता. या दाव्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष यांनी पंतप्रधानांना काही सवाल उपस्थित केले. “चीनच्या आक्रमकतेमुळे पंतप्रधानांनी भारतीय भूभाग चीनच्या हवाली केला. जर तो भूभाग चीनचा होता तर मग भारतीय जवानांना का मारण्यात आले ? कुठे मारण्यात आले”, असे ट्विट राहुल गांधींनी केले.
भारत-चीनमधील सीमासंघर्ष चिघळायला सुरुवात झाली. गलवान खोऱ्यात 15 जून रोजी रात्री भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये हिंसक झडप झाली. यात भारताचे तब्बल २० जवान शहीद झाले. देशभरातून मोठा संताप व्यक्त होऊ लागला. याच पार्श्वभूमीवर, भारत-चीन सीमाभागात निर्माण झालेल्या तणावपूर्ण स्थितीवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी(१९ जून) संध्याकाळी ५ वाजता सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या सर्वपक्षीय बैठकीत देशभरातील २० राजकीय पक्षांच्या अध्यक्षांचा समावेश होता.या बैठकीनंतर पंतप्रधानांनी दिलेल्या निवदेनातील वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.