HW News Marathi
Covid-19

राज्यात आतापर्यंत सात लाखांहून अधिक चाचण्या । राजेश टोपे

मुंबई। राज्यात आज कोरोनाबाधितांचा आकडा ३ हजार ८२७ ने भर पडली आहे. तर आज (१९ जून) दिवसभरात १४२ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज १ हजार ९३५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, राज्यात आतापर्यंत एकूण ६२ हजार ७७३ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्या १ लाख २४ हजार ३३१ कोरोनाबाधित रुग्ण झाले आहे. तसेच राज्यात एकूण ५५ हजार ६५१ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

 

राज्यात सध्या ६० शासकीय आणि ४३ खाजगी अशा एकूण १०३ प्रयोगशाळा करोना निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७ लाख ३५ हजार ६७४ नमुन्यांपैकी १ लाख २४ हजार ३३१ नमुने पॉझिटिव्ह (१६.९ टक्के) आले आहेत. सध्या राज्याचे प्रति दशलक्ष प्रयोगशाळा नमुन्याचे प्रमाण ५३१७ एवढे असून हे प्रमाण देशपातळीवर ४२१० एवढे आहे. राज्यात ५ लाख ९१ हजार ४९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २५ हजार ६९७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात १४२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्यमंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे-१२४ (मुंबई ११४, ठाणे २, वसई-विरार ५, रायगड ३), नाशिक-९ (नाशिक, धुळे, जळगाव प्रत्येकी ३), पुणे-१ (सोलापूर १), औरंगाबाद-८ (औरंगाबाद ८).

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ८९ पुरुष तर ५३ महिला आहेत. आज नोंद झालेल्या १४२ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ७४ रुग्ण आहेत तर ५७ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ११ जण ४० वर्षांखालील आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ५८९३ झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मार्गदर्शक तत्वे जाहीर झाल्याने चित्रीकरणाला वेग येणार | सांस्कृतिक कार्यमंत्री

News Desk

‘या’ कारणामुळे नवनिर्वाचित भाजपचे आमदार रमेश कराड यांच्यावर गुन्हा दाखल

News Desk

भारतात १६ जानेवारीपासून जगातील सर्वात मोठ्या लसीकरण कार्यक्रमाला होणार सुरुवात | पंतप्रधान

News Desk