HW News Marathi
Covid-19

पंतप्रधान मोदी आज उद्धव ठाकरे यांच्यासह १५ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी कोरोना स्थितीवर करणार चर्चा

मुंबई | देशात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. अनलॉक १.० होऊन दोन आठवडे उलटून गेले आहे. तरी देशातील रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होते. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (१७ जून) मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोरोना आणि अनलॉक १.० नंतर काय परिस्थिती आहे, यावर चर्चा करणार आहेत. आज दुपारी ३ वाजात मुख्यमंत्री चर्चा करणार आहेत. दोन टप्प्यात ही बैठक असून, पहिल्या दिवशी २१ राज्य व केंद्र शासित प्रदेशातील मुख्यमंत्र्यांशी मोदींनी काल (१६ जून) संवाद साधला.

दरम्यान, मोदी आज म्हणजे दुसऱ्या टप्प्यात १५ राज्यातील मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. कोरोना रुग्णांची संख्या जास्त असलेल्या राज्यातील मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. यात दिल्ली, महाराष्ट्र, तामिळनाडू, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा समावेश आहे. या राज्यातील शहरात म्हणजे दिल्ली, मुंबई, चेन्नई, अहमदाबाद रुग्ण वाढीचा वेग अधिक आहे. लॉकडाऊननंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मुख्यमंत्र्यांशी पाचव्यांदा चर्चा करणार आहेत. तर अनलॉक १.० नंतर ही पहिली चर्चा असणार आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ओमिक्रॉनपासून बचावासाठी वैद्यकीय सुविधा सुसज्ज ठेवा! – डॉ. नितीन राऊत

Aprna

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर उद्याऐवजी सोमवारपासून दुकान सुरू करण्याचा निर्णय

News Desk

देशात गेल्या २४ तासांत ९९८५ नवे कोरोनाचे रुग्ण, तर रुग्ण बरे होण्याच्या संख्येत वाढ

News Desk