मुंबई। राज्यात आज राज्यात आज २ हजार ७८६ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज (१५जून) एकाच दिवसात सर्वाधिक १७८ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे ४ हजार १२८ लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच राज्यातील ५०७१ रुग्णांना विविध रुग्णालयांतून डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील एकूण रुग्णसंख्या आता १ लाख १० हजार ७४४ वर पोहचली आहे. त्यातील ५० हजार ५५४ रुग्णांवर प्रत्यक्ष उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
राज्यात आज 2786 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 110744 अशी झाली आहे. आज नवीन 5071 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 56049 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 50554 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.#CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak
— Rajesh Tope (@rajeshtope11) June 15, 2020
राज्यात सध्या ५५ शासकीय आणि ४२ खाजगी अशा एकूण ९७ प्रयोगशाळा कोरोना निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६ लाख ६९ हजार ९९४ नमुन्यांपैकी १ लाख १० हजार ७४४ नमुने पॉझिटिव्ह (१६.५२ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ८९ हजार १५८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात १५४७ संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ८० हजार ६७० खाटा उपलब्ध असून सध्या २८ हजार ८४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात १७८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे- १४३ (मुंबई ६८, वसई-विरार २०,मीरा-भाईंदर १३, नवी मुंबई १२, ठाणे १२, पनवेल ७, कल्याण-डोंबिवली ९, पालघर १, रायगड १), पुणे- १६ (पुणे १४, सोलापूर २), नाशिक-१६ (धुळे १३,जळगाव ३), कोल्हापूर-१ (रत्नागिरी १), औरंगाबाद-२ (जालना २).
आज नोंद झालेल्या १७८ मृत्यूपैकी ६०वर्षे किंवा त्यावरील ९१ रुग्ण आहेत तर ७४ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर १३ जण ४० वर्षांखालील आहे. यापैकी ४१ जणांच्या इतर आजाराबद्दल माहिती उपलब्ध नाही. उर्वरित १३७ रुग्णांपैकी ९५ जणांमध्ये ( ६९.३४ टक्के) मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ४१२८ झाली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.