मुंबई | एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. राज्यात आज (१५जून) एका दिवसात ५०७१ रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तपर्यंत सगळ्यात जास्त रुग्णांना एका दिवसात डिस्चार्ज आज देण्यात आला आहे. आणि यात प्रामुख्याने मुंबईत ४२४२ रुग्णांना आज घरी पाठवण्यात आले आहे.
महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या दृष्टीने ही खूप चांगली बातमी आहे. तसेच, राज्यातील रिकव्हरी रेट हा आता ४७.२% इतका झाला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. तर, राज्यात आतापर्यंत ५६,०४९ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत.
5071 #COVID19 patients discharged today. The recovery rate in the state is 47.2%. So far, 56,049 patients have recovered: Maharashtra Health Minister Rajesh Tope
(file pic) pic.twitter.com/m8VkycFfvo— ANI (@ANI) June 15, 2020
राज्यात २९ मे रोजी ८३८१ रुग्णांना घरी सोडले होते. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्याची ती पहिलीच वेळ होती. त्यानंतर बरे होणाऱ्या रुग्णांचा आलेख सातत्याने वाढता. कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्याच्या तीन महिन्यानंतर राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर झाला ४७.२ टक्के आहे.
राज्यात २९ मे रोजी ८३८१ रुग्णांना घरी सोडले होते. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्याची ती पहिलीच वेळ. त्यानंतर बरे होणाऱ्या रुग्णांचा आलेख सातत्याने वाढता. कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्याच्या तीन महिन्यानंतर राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर झाला ४७.२ टक्के.
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) June 15, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.