HW News Marathi
महाराष्ट्र

चंद्रशेखर ऊर्फ शेखर भोयर यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी

मुंबई | विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या अमरावतीतील अधिकृत उमेदवाराच्या विरोधात अपक्ष उमेदवारी दाखल केलेले चंद्रशेखर ऊर्फ शेखर भोयर यांची पक्ष शिस्त मोडल्याप्रकरणी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असल्याची माहिती प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी दिली.

अमरावती शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेचे श्रीकांत देशपांडे यांना महाविकास आघाडीने अधिकृत उमेदवारी दिली आहे. या मविआच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात चंद्रशेखर ऊर्फ शेखर भोयर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करुन निवडणूक लढवत आहे. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने कोणताही पाठिंबा दिलेला नाही. पक्षाची शिस्त भंग केल्यामुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

परमबीर सिंग यांच्यासह २७ पोलिस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

News Desk

काँग्रेस पक्ष सरकारविरोधातील संघर्ष आणखी तीव्र करणारः खा. अशोक चव्हाण

News Desk

“केंद्रीय गृहसचिवांना फडणवीसांनी ६.३ जीबीची कोणती पेनड्राईव्ह दाखवली?”, कॉंग्रेसचा सवाल  

News Desk